Honda Elevate : ह्युंदाई क्रेटा आणि सेल्टॉसला टक्कर देणाऱ्या होंडाच्या या नवीन एसयूव्हीचे नाव Honda Elevate असणार आहे. जपानी कार निर्माता ऑटो कार कंपनी होंडाने पहिल्यांदा Honda Elevate एसयूव्हीचे बॅजिंगला टीज केले आहे. सीआर व्ही ही कार बाजारातून गेल्यानंतर कंपनीची ही पहिली कॉम्पॅक्ट एसयूव्ही असेल.
होंडा एलिवेट एसयूव्हीला औपचारिकपमए पुढील महिन्यात आणले जाईल. भारतीय बाजारात लाँच करण्यात आल्यानंतर या कारची मारुती सुझुकीच्या ग्रँड विटारा, टोयोटाची अर्बन क्रूझर हायराइडर, ह्युंदाई क्रेटा आणि किआ सेल्टॉस सारख्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीला जोरदार टक्कर देईल.
सिटी सेडान प्लॅटफॉर्मवर बेस्ड असेल एलिवेट
अपकमिंग होंडा एसयूव्हीला अधिकृतपणे अनवील करण्याआधी अनेकदा रस्त्यांवर टेस्टिंग करताना पाहिले गेले आहे. एसयूव्ही नवीन जनरेशनची सिटी सेडानच्या समान प्लॅटफॉर्मवर बेस्ड असेल.
सीआर व्ही मॉडलवर बेस्ड असेल एलिवेट
होंडा एलिवेटची डिझाइन जगभरात विकल्या जाणाऱ्या सीआर व्ही मॉडलवर बेस्ड असण्याची शक्यता आहे. होंडाने याआधी अपकमिंग एसयूव्हीच्या एका स्केच इमेजला टीज करण्यात आले होते.
जे नवीन सीआर व्ही मॉडलशी मिळती जुळती आहे. ही एक मोठ्या ग्रिल सोबत समोरून स्लिम आणि शार्प एलईडी हेडलाइट यूनिट सोबत येते स्केच सोबत आता पर्यंत स्पाय शॉट्स वरून हे उघड झाले की, ही एक मस्कूलर फेस आणि एलिवेट एसयूव्ही सोबत येईल. एसयूव्ही मल्टि स्पोक अलॉय व्हील्सच्या सेट वर बसेल. याची डायमेंशन १६ इंचापेक्षा कमी नसेल.
इंजिन पॉवरट्रेन
होंडा एलिवेट एसयूव्हीच्या १.५ लीटर पेट्रोल इंजिन सोबत येण्याची शक्यता आहे. ही १.५ लीटर, चार सिलिंडर यूनिट सोबत येऊ शकते. जी नवीन जनरेशनची होंडा सिटी मध्ये उपयोग केला जाऊ शकतो. इंजिन सिटी मध्ये जवळपास १२० बीएचपीचे पॉवर जनरेट करते. अपकमिंग एसयूव्हीसाठी आउटपूट जवळपास ११० बीएचपी असण्याची शक्यता आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.