Honda Goldwing Sakal
विज्ञान-तंत्र

Honda Goldwing : कार पाठोपाठ एअरबॅग असलेली बाईक आली बाजारात, जाणून घ्या किंमत

होंडा गोल्डविंग टूरमध्ये एअरबॅगशिवाय अनेक उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Honda Goldwing : सुरक्षेच्या दृष्टीने कारमध्ये एअर बॅग्स (Air Bag In Bike) असतात हे आपल्यापैकी जवळपास सर्वांनाच माहिती आहे. मात्र, तुम्ही कधी बाईकला एअर बॅग असल्याचे ऐकले किंवा पाहिले आहे का? नाही ना पण हे खरंय की, Honda Motorcycle and Scooter India (HMSI) ने भारतात अशी बाईक लॉन्च केली आहे, ज्यामध्ये एअरबॅग देण्यात आली आहे. होंडाची नवीन (Honda New Bike) बाईक म्हणजे होंडा गोल्ड विंग टूर, ज्याची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. (Honda Goldwing Bike Launched In India)

लाँच करण्यात आलेल्या या बाईकची किंमत सर्वाधिक महागडी कार म्हणून ओळक असणाऱ्या फॉर्च्युनर कारपेक्षाही अधिक असून, गुरुग्राममध्ये होंडा गोल्ड विंग टूरची (Honda Gold Wing Tour) एक्स-शोरूम किंमत 39.20 लाख रुपये इतकी आहे. तर, याच्या तुलनेत फॉर्च्युनरची (Fortuner) एक्स-शोरूम किंमत सुमारे 32 लाख रुपयांपासून सुरू होते.

या शहरांमध्ये बुकिंग सुरू

गुरुग्राम व्यतिरिक्त, कंपनीने मुंबई, बंगलोर, इंदूर, कोची, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता येथे असलेल्या विशेष बिगविंग टॉपलाइन डीलरशिपवर या लक्झरी बाइकसाठी बुकिंग घेणे सुरू केले आहे. चेन्नई, कोची आणि बंगळुरूमध्ये या बाईकची एक्स-शोरूम किंमत 40 लाखांच्या पुढे आहे. कंपनीने या बाइकमध्ये 1,833 cc इंजिन दिले आहे, जे 170 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. (Features Of Honda Gold Wing Tour Bike )

बाईकमध्ये आहेत अनेक वैशिष्ट्ये

होंडा गोल्डविंग टूरमध्ये एअरबॅगशिवाय अनेक उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत. यात एक विस्तारित इलेक्ट्रिक स्क्रीन (Electric Screen) आहे, जी डाव्या हँडलबारवरून ऑपरेट केली जाऊ शकते. कंपनीने यामध्ये 7 इंचाची TFT लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले स्क्रीन दिली आहे. या होंडा बाईकमध्ये जायरोस्कोपदेखील आहे, जे बोगद्यातही रायडरला नेव्हिगेशन (Navigation) सुविधा देण्यास मदत करेल. यात Apple CarPlay आणि Android Auto देखील आहे. याशिवाय, बाईकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि यूएसबी टाइप-सी सॉकेट सारखे फीचर्सदेखील देण्यात आले आहेत.

गोल्डविंग टूरमधील खास गोष्टी

गोल्ड विंग बाईकच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये क्रूझ कंट्रोलचाही समावेश आहे. यात कारप्रमाणे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची सुविधाही आहे. या बाइकमध्ये चार ऑटोमॅटिक राइड मोड आहेत. बाईक मॅन्युअल मोडमध्येही चालवता येते. बाईकमध्ये Honda Selectable Torque Control (HSTC) वैशिष्ट्येदेखील आहे, जे मागील चाकाला ट्रॅक्शन राखण्याचे काम करते. बाईकची पेट्रोलच्या टाकीची क्षमता 21 लिटर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT