WhatsApp 
विज्ञान-तंत्र

सावधान! WhatsApp OTP Scam मधून हॅकर्स साधतायत निशाणा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं सोशल मीडिया मेसेजिंग App WhatsApp सातत्याने काही ना काही अपडेट देत असतं. अनेकदा व्हॉटसअॅपच्या चॅट सुरक्षिततेबाबत उलट सुलट चर्चा केली जाते. हॅकर्स या अॅपला सहज टार्गेट करू शकतात. युजर्स काळजी घेत नाहीत आणि हॅकर्सच्या जाळ्यात फसतात. स्कॅमर्स, हॅकर्ससाठी सर्वात सोपी पद्धत म्हणजे ओटीपीच्या माध्यमातून अकाउंटचा अॅक्सेस मिळवणं. लोकांना स्कॅममध्ये अडकवण्यासाठी साध्या अशा ओटीपीचा वापर केला जातो. 

व्हॉट्सअॅप ओटीपी स्कॅम काय?
नवीन व्हॉटस्अप अकाउंट किंवा नवीन सेटअप मारताना तुम्हाला नंबर रजिस्टर करावा लागतो. त्यावेळी रजिस्टर्ड नंबरवर एक ओटीपी येतो. व्हॉट्सअॅप सेटअप करण्यासाठी हा ओटीपी महत्त्वाचा असतो.
बँक किंवा इतर फ्रॉड करणाऱ्यांकडून ओटीपी मागितला जातो. त्याआधारे तुमची माहिती चोरी केली जाते तसंच तुमच्या रजिस्टर्ड नंबरचा वापर करून बँक डिटेल्स, खात्यातून रक्कम काढण्याचे प्रकार होतात. व्हॉट्सअॅपचा ओटीपी मिळवण्यासाठी तुमचा फोन नंबर टाकावा लागतो. तुम्ही रिक्वेस्ट केल्याशिवाय व्हॉट्सअॅप कधीच ओटीपी पाठवत नाही. 

कसे करतात हॅक?
हॅकर्स आणि स्कॅमर्स व्हॉट्सअॅपच्या या ओटीपी फीचरचा वापर करत आहेत. हा फ्रॉड तुमच्या तुमचा मित्र किंवा नातेवाइकांपैकी एक असल्याचं सांगून फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये स्वत:चं व्हॉट्सअॅप अकाउंट बंद झाल्याचं सांगत मदतीची विनंती केली जाते.

हॅकर्सकडून त्यांचे अकाउंट लॉक झाल्याचं सांगत ओटीपी मिळत नसल्याचं सांगतात. तसंच तुम्हाला एक ओटीपी मिळेल तो पाठवा असं म्हणतात. यानंतर तुम्हा एक ओटीपी येईल आणि तो शेअर करा असं म्हणतात. ओटीपी शेअर करताच तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरून व्हॉटसअॅप अकाउंटमधून लॉगआऊट व्हाल. त्याचवेळी व्हॉट्सअॅप दुसऱ्या डिव्हाइसवर वापरत असल्याचं नोटिफिकेशनही मिळेल. 

हॅकर्स इतर मोबाइलमध्ये तुमचा व्हॉटसअॅप नंबर टाकतात आणि त्यामुळे तुम्हाला ओटीपी मिळतो. जर तुम्ही ओटीपी शेअर केला तर तुमच्या अकाउंटचा अॅक्सेस सहज त्याला मिळेल. ओटीपी शेअर केल्यानंतर हॅकर्स तुमच्या अकाउंटचा चुकीच्या कामासाठी वापर करतील आणि तुम्हाला काहीच करता येणार नाही. 

व्हॉट्सअॅप रिसेट करा
तुमच्या व्हॉटसअॅप अकाउंटबाबत असं काही झालं असेल तर लगेच व्हॉट्सअॅप रिसेट करण्याची गरज आहे. तुमचा रजिस्टर्ड नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला ओटीपी मिळेल तो टाकून तुमच्या डिव्हाइसवर व्हॉटसअॅप सुरू करता येते. तुमच्याकडे व्हॉटसअॅप सुरू झाल्यानंतर हॅकर्सकडे असलेलं व्हॉट्सअॅप बंद होईल. 
ओटीपी स्कॅममधून कसं वाचायचं?

जोपर्यंत तुम्ही ओटीपीसाठी रिक्वेस्ट टाकलेली नसते तोपर्यंत व्हॉटसअॅप ओटीपी पाठवत नाही. जर तुम्हाला रिक्वेस्ट न पाठवता ओटीपी आला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा आणि कोणासोबतही ओटीपी शेअर करू नका. मित्र आणि नातेवाइक जरी तुमच्याकडे ओटीपी मागत असतील तरी शेअर करू नका. ओटीपीची मागणी करणारा मेसेज मिळाला तर त्यांना कॉल करून विचारा. तसंच तुमच्या सुरक्षिततेसाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशनसुद्धा अॅक्टिवेट करून ठेवा.

- सायन्स टेक्नॉलॉजीसंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: मोदींचा मेमरी लॉस... राहुल गांधींनी अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचा किस्सा सांगत केली तुलना, अमरावतीत फटकेबाजी

Jhansi Fire Incident : फायर अलार्म वाजला असता तर वाचला असता 10 मुलांचा जीव!

Latest Maharashtra News Updates live : सलग तिसऱ्या दिवशी अजित पवार नाशिक दौऱ्यावर

Amit Shah : छत्रपतींच्या गडसंवर्धनासाठी दोन हजार कोटींची तरतूद...अमित शहा : उमरखेड येथील प्रचारसभेत काँग्रेसवर साधला निशाणा

Suryakumar Yadav: प्रतिष्ठेची टोपी! सूर्यानं खाली पडलेली इंडियाची कॅप उचलून केलेल्या कृतीनं जिंकली मनं, Video Viral

SCROLL FOR NEXT