voter id sakal
विज्ञान-तंत्र

घरबसल्या बनवा तुमचे मतदार ओळखपत्र; जाणून घ्या सोपी पद्धत

सकाळ डिजिटल टीम

आजकाल स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी तसेच सरकारी-निमसरकारी सुविधांचा लाभ घेताना, बँकेतील कामांसाठी आधार कार्डचा वापर केला जात आहे. पण त्यामुळे तुमच्या मतदार ओळखपत्राचे महत्व कमी होत नाही. ते अजूनही एक अतिशय महत्त्वाचे डॉक्यूमेंट आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही निवडणुकीत मतदान करू शकता. ते मिळवण्यासाठी तुम्ही तुमचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त पुर्ण केलेले असणे आवश्यक आहे.

पण अनेकांना वाटते की ते तयार करुन घेण्यासाठी निवडणूक कार्यालयात जावे लागेल. पण तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घरबसल्या त्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता आणि ते तुमच्या घरी येईल. यासाठी एक अतिशय सोपी पध्दत आहे, ज्याद्वारे तुम्ही ते बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया अर्ज कसा करायचा…

मतदार ओळखपत्रासाठी अर्ज कसा करावा

सर्वप्रथम तुम्हाला राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल https://nvsp.in/ च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला login पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि नंतर Don't have an account, register as a new user या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

यानंतर, एक रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्या समोर उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमची आवश्यक माहिती भरावी लागेल- जसे की, अर्जदाराचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इ.

हा तपशील भरल्यानंतर, तुम्हाला तुमचा पासवर्ड निवडावा लागेल आणि नंतर रजिस्टर पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ईमेल आयडी आणि पासवर्डने लॉग इन करावे लागेल.

आता तुम्हाला फ्रेश इन्क्लुजन आणि एनरोलमेंट (Fresh Inclusion and enrollment) या पर्यायावर क्लिक करावे लागेल. मग तुम्हाला तुमची सिटीझनशीप स्टेटस आणि राज्य निवडावे लागेल

आता तुमच्यासमोर फॉर्म 6 उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला नाव, जन्मतारीख, पत्ता यासारखी इतर महत्त्वाची माहिती भरायची आहे. यानंतर तुम्हाला सबमिट वर क्लिक करावे लागेल आणि त्यानंतर तुमचे मतदार ओळखपत्र अर्ज पुर्ण होईल. यानंतर ते तयार होईल आणि ते तुमच्या पत्त्यावर पोहोचेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT