Cyber Fraud in Festive Season : सणाच्या काळात खरेदी करण्याचा उत्साह असतो, परंतु याच काळात सायबर फसवणुकीचे प्रकारही वाढतात. ऑनलाईन पेमेंट फसवणूकीमूळे आपल्या पैशांना धोका निर्माण करू शकते. एकदा फसवणुकीत अडकल्यावर त्यातून सुटका कशी मिळवायची? या समस्येवर मात कशी करायची यासाठी आम्ही तुम्हाला पाच महत्त्वाच्या टिप्स देणार आहोत. ज्या तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील.
फसवणूक लक्षात येताच तुमच्या बँक किंवा पेमेंट प्रोव्हायडरच्या अधिकृत ग्राहक सेवा क्रमांकावर तात्काळ संपर्क साधा. अधिकृत क्रमांकाशिवाय इतर कोणत्याही क्रमांकावर कॉल करू नका. तुमचे खाते फ्रीझ करा किंवा कार्ड/पेमेंट पद्धत तात्काळ ब्लॉक करा, त्यामुळे भविष्यातील कोणत्याही आर्थिक नुकसानाची शक्यता कमी होईल.
फसवणुकीची माहिती तात्काळ बँकेला आणि संबंधित अधिकाऱ्यांना द्या. राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन (1930) वर कॉल करा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा. तक्रारीची प्रत स्वतःकडे ठेवा, जेणेकरून भविष्यात त्याचा वापर करता येईल.
फसवणूक लक्षात येताच घाबरून जाऊ नका, उलट शांत राहून सर्व तपशील नोंदवा. फोनवरील संभाषण, मेसेजेस, स्क्रीनशॉट्स आणि व्यवहार आयडी, रक्कम यासारख्या तपशीलांची नोंद ठेवा. या सर्व माहितीचा उपयोग तक्रार करताना होईल.
4. सुरक्षा प्रणाली अधिक मजबूत करा
तुमच्या खात्यांची सुरक्षा वाढवण्यासाठी पासवर्ड अपडेट करा आणि दोन-स्तरीय प्रमाणीकरण सक्षम करा. मोबाईल किंवा संगणकात मजबूत अँटी-मालवेअर सॉफ्टवेअर स्थापित करा. सुरक्षित पेमेंट पर्याय निवडा, जसे की RBI च्या मार्गदर्शनानुसार टोकनायझेशनचा वापर करा.
फसवणूक झाल्यानंतर आपल्या अनुभवातून शिकून इतरांनाही जागरूक करा. आपले मित्र, कुटुंबीय आणि सोशल मीडियावर फसवणुकीबाबत माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांनाही सावध राहता येईल.
सामूहिक प्रयत्नांमधून आपण सायबर जगात अधिक सुरक्षितता निर्माण करू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.