Google Pay एक लोकप्रिय पेमेंट अॅप आहे जे तुम्हाला तुमच्या बँक खात्यातून थेट य UPI (Unified Payments Interface) द्वारे पेमेंट करण्यास, ऑनलाइन शॉपिंग करण्यास किंवा जवळजवळ कोणालाही रिअल टाइममध्ये पैसे पाठवण्यास मदत करते. पण तुमचा ईमेल आयडी बदलण्याची गरज पडली तर काय करायचं? आणि ईमेल आयडी कश्या प्रकारे बदलून घ्यायचे हे समजून घेण्यासाठी वाचा पुढील सोप्या पद्धती...
भारतात डिजिटल पेमेंट्सची क्रांती होत असताना, Google Pay या अॅपने खूपच कमी काळात लोकांच्या जीवनात प्रवेश केला आहे. याची अनेक कारणे आहेत. Google Pay द्वारे पैसे पाठवणे, बिले भरणे किंवा ऑनलाइन खरेदी करणे हे फक्त काही क्लिक्सच्या अंतरावर आहे.
Google Pay ही एक सुरक्षित प्लॅटफॉर्म आहे. UPI PIN आणि इतर सुरक्षा उपाय तुमच्या पैशांची सुरक्षा करतात. भारतातील मोठ्या प्रमाणात व्यापारी आणि दुकानदार Google Pay स्वीकारतात.
Google Pay अॅप थेट ईमेल आयडी बदलण्याची परवानगी देत नाही. पण काही सोप्या ट्रिक्स वापरुन तुम्ही तुमचा ईमेल आयडी सहज अपडेट करू शकता.
तुमच्या फोनमधील सेटिंग्जमध्ये जा.
आता अॅप्सवर जा आणि मॅनेज अॅप्सवर क्लिक करा.
अॅप्सच्या यादीतून 'Google Pay' अॅप निवडा.
'क्लियर डाटा' वर टॅप करा आणि तुमच्या फोनवर Google Pay अॅप उघडा.
आता तुम्ही पुन्हा Google Pay अॅपवर रजिस्टर करू शकता. बँक खात्याशी लिंक असलेला तुमचा मोबाईल नंबर एंटर करा.
तुमच्या Google Pay खात्याशी जोडलेले Gmail अॅड्रेस आता स्वयंचलितपणे दिसतील. आता तुम्ही ईमेल आयडी बदलू शकता.
एडिट ऑप्शनवर टॅप करा आणि ईमेल आयडी बदला. 'चेंज गुगल अकाउंट' निवडा आणि नंतर 'अॅड अकाउंट' वर टॅप करा, मग नवीन ईमेल आयडी एंटर करा.
झाली सोपी प्रोसेस. आता tumतुमचे Google Pay तुमच्या नवीन ईमेल आयडी सह सुरू होईल.
Google Pay मध्ये फक्त पैसे पाठवण्याची सुविधा नाही तर बिल पेमेंट, रिचार्ज, म्युच्युअल फंड्स इत्यादी अनेक वैशिष्ट्ये आहेत.
इंटरनेट नसल्यासही, काही ठिकाणी ऑफलाइन पेमेंट्स करण्याची सुविधा Google Pay देते.अनेक सरकारी योजनांमध्ये Google Pay ला प्राधान्य दिले जाते.Google Pay आपल्या वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन सतत नवीन वैशिष्ट्ये जोडत असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.