Transfer Voter ID eSakal
विज्ञान-तंत्र

Transfer Voter ID : लग्नानंतर मतदान ओळखपत्र नवीन पत्त्यावर कसं करायचं ट्रान्सफर? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया

Sudesh

How to Change Voter ID Address : भारतातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे मतदान ओळखपत्र. मतदानाचा मूलभूत हक्क बजावण्यासाठी ते भारतीय असल्याची ओळख दर्शवण्यासाठी हे मतदान ओळखपत्र कामी येतं. मात्र, कित्येक वेळा यामध्ये अपडेट करुन घेणं गरजेचं असतं. विशेषतः मुलींना लग्नानंतर मतदान ओळखपत्र नवीन पत्त्यावर ट्रान्सफर करण्याची गरज भासते.

तुमचं मतदान ओळखपत्र (Voter ID) नवीन पत्त्यावर ट्रान्सफर करण्यासाठीची प्रक्रिया अगदी सोपी आहे. तुम्ही घरबसल्या देखील ऑनलाईन ही प्रक्रिया करू शकता. आम्ही तुम्हाला याची स्टेप-बाय-स्टेप माहिती देणार आहोत. यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला कोणत्या कागदपत्रांची गरज भासणार आहे, हे जाणून घेऊयात.

आवश्यक कागदपत्रे

  • युटिलिटी बिल (पाणी, गॅस, वीज) - यावरील तारीख मागच्या एका वर्षाच्या आतील हवी.

  • आधार कार्ड

  • सरकारी, मान्यताप्राप्त बँक किंवा पोस्ट ऑफिस अकाउंटचं चालू पासबुक

  • भारतीय पासपोर्ट

  • नोंदणीकृत लीज किंवा भाडेकरार

  • नोंदणीकृत विक्री करार

  • शेतकरी खातेवहीसह महसूल विभागाच्या जमिनीच्या मालकीच्या नोंदी

अशा प्रकारे करा अर्ज

यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टलवर अकाउंट उघडावं लागेल. यानंतर National Voters Service Portal (NVSP) वेबसाईटवर जाऊन लॉगइन करायचं आहे.

यानंतर होम पेजवर शिफ्टिंग ऑफ रेसिडेंस (Shifting of Residence) हा पर्याय दिसेल. यामध्ये 'फिल फॉर्म 8' हा पर्याय निवडा.

यानंतर तुम्ही जर स्वतःसाठी फॉर्म भरत असाल, तर Self या पर्यायावर क्लिक करा. पुढे EPIC नंबर एंटर करून सबमिट बटणावर क्लिक करा.

यानंतर आपल्या व्होटर डिटेल्स नीट तपासून घ्या, आणि शिफ्टिंग ऑफ रेसिडेंट या पर्यायावर क्लिक करा.

यानंतर आलेल्या फॉर्ममध्ये तुम्हाला काही माहिती भरावी लागेल. यामध्ये राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि नवीन पत्ता भरावा लागेल.

त्यानंतर मागितलेले डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील. यानंतर कॅप्चा कोड एंटर करून रिव्ह्यू अँड सबमिट बटणावर क्लिक करा.

यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर एप्लिकेशन रेफरन्स नंबर येईल.

काही दिवसांनंतर तुम्ही NVSP पोर्टलवरुन आपलं अपडेटेड डिजिटल व्होटर आयडी डाऊनलोड करू शकाल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT