Check AC Gas at Home : उन्हाळा सुरू होताच कित्येक लोक एसीला सर्व्हिसिंग करून घेतात. एसीचं आयुष्य वाढावं, आणि चांगली कूलिंग द्यावी यासाठी ही गोष्ट चांगलीच आहे. मात्र, कित्येक वेळा मेकॅनिक स्वतःच्या फायद्यासाठी एसीमधील गॅस संपल्याचं किंवा गॅस लीक होत असल्याचं सांगतात. या माध्यमातून मोठं बिल बनवून ग्राहकांना लुबाडण्याचे प्रकार होत असतात. त्यामुळे स्वतःच एसी तपासणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं.
एसीमधील गॅस संपला आहे, किंवा लीक होत आहे का हे तपासण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एसीमध्ये दोन प्रकारचे गॅस असतात. R32 आणि R410 असे हे दोन प्रकार आहेत. आजकाल सर्वच एसींमध्ये R32 हा गॅस आढळतो. हा गॅस लीक झाला तरी पर्यावरणाला यामुळे धोका निर्माण होत नाही.
सगळ्यात आधी एसी सुरू करा, आणि काही वेळाने कूलिंग कॉईल तपासा. जर तुमचा एसी कूलिंग करत नसेल, तर त्यातील गॅस कमी झालेला किंवा संपलेला असू शकतो. (AC Cooling)
जर तुमच्या एसीमधून बबलिंगचा आवाज येत असेल, तर त्यातील गॅस कमी झालेला किंवा संपलेला असू शकतो.
एसी सुरू आहे आणि कूलिंगही होत आहे, मात्र रुममधील ह्युमिडिटी (दमट वातावरण) कमी होत नसेल तर एसीमधील गॅस कमी असू शकतो. (Check AC Gas)
एसीमधील कंप्रेसर पाहूनही तुम्ही हे ओळखू शकता. एसीचा कंप्रेसर रूम टेम्परेचरनुसार आपोआप ऑन-ऑफ होतो. जर तुमच्या एसीचा कंप्रेसर आधीच्या तुलनेत कमी वेगाने सुरू किंवा बंद होत असेल, तर एसीमधील गॅस कमी झालेला असू शकतो. (AC Compressor)
एसीचा गेझ कंप्रेसर हा गॅस प्रेशर तपासतो. इन्व्हर्टर एसीमध्ये 150 हे नॉर्मल गॅस प्रेशर असते. तसंच, साध्या एसीमध्ये 60 ते 80 हे प्रेशर सामान्य असतं. यापेक्षा कमी प्रेशर असेल तर एसीमधील गॅस कमी असू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.