simple steps check call history airtel jio numbers esakal
विज्ञान-तंत्र

Call History Check : गेल्या 6 महिन्यांची कॉल हिस्ट्री मिळवा एका क्लिकमध्ये..

Saisimran Ghashi

How to check call history : स्मार्टफोन आता आपल्या सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. अनेकदा आपल्याला गेले काही महिने कोणाला फोन केला होता या कोणत्या नंबरवरून मिस्ड कॉल आला होता हे तपासण्याची गरज पडू शकते. तुमच्या फोनमध्ये असलेला कॉल लॉग गेल्या महिनाभराचा कॉल हिस्ट्री दाखवतो पण गेली सहा महिने तपासायची असल्यास काय करायचं? चला तर भारतातील दोन प्रमुख दूरसंचार कंपन्या एअरटेल आणि जियो यांनी उपलब्ध करून दिलेल्या सोप्या पद्धती जाणून घेऊया.

एअरटेल वापरकर्ते (track call records six months airtel jio)

एअरटेल वापरकर्ते गेले सहा महिने कॉल हिस्ट्री तपासण्यासाठी दोन सोप्या पद्धती वापरू शकतात.

SMS द्वारे:

  • तुमच्या एअरटेल फोनवर मेसेज अॅप उघडा आणि रिसीव्हरमध्ये "121" टाका.

  • मेसेज बॉक्समध्ये "EPREBILL" लिहा.

  • तुम्हाला कॉल डिटेल्स हव्या असलेला कालावधी किंवा विशिष्ट तारखा लिहा.

  • तुमच्या ईमेल आयडीची माहिती द्या जिथे कॉल डिटेल्स पाठवून द्याव्यात.

  • हा मेसेज तुमच्या एअरटेल नंबरवरून पाठवा.

एअरटेल वेबसाइट द्वारे:

  • एअरटेल वेबसाइटवर जा आणि तुमच्या मोबाईल नंबर आणि पासवर्ड वापरून तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करा.

  • 'Usage Details' (वापर तपशील) या सेक्शनवर जा.

  • 'Usage Details' अंतर्गत विशिष्ट कालावधीसाठी कॉल रेकॉर्ड पाहण्याचा पर्याय शोधा.

  • तुम्हाला हवी असलेली तारीख निवडा आणि 'Submit' (जमा करा) वर क्लिक करा.

  • तुमचे कॉल रेकॉर्ड स्क्रीनवर दाखवले जातील.

एअरटेल कस्टमर केअरशी संपर्क साधून किंवा एअरटेल स्टोअरला भेट देऊन तुम्ही तुमच्या कॉल रेकॉर्डची कॉपी मागवू शकता. यासाठी शुल्क लागू होऊ शकते आणि खाते सत्यापनासाठी ओळखपत्र द्यावे लागू शकते.

जियो वापरकर्ते

जियो वापरकर्त्यांना त्यांचा कॉल रेकॉर्ड सहजतेने 'MyJio' अॅप वापरून मिळवता येतो.

  • तुमच्या स्मार्टफोनमध्ये गुगल प्ले स्टोअर उघडा आणि MyJio अॅप इंस्टॉल करा.

  • अॅपमध्ये लॉग इन करा आणि तुमचा जियो नंबर लिंक करा.

  • अॅपच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या तीन आडव्या रेषांवर क्लिक करा.

  • "माझे स्टेटमेंट" या पर्यायवर टॅप करा.

  • तुम्ही ज्या तारखांचा कॉल रेकॉर्ड पाहू इच्छिता ते टाका.

  • 'View' (पहा) वर टॅप करा आणि तुमच्यासमोर तुमचा कॉल रेकॉर्ड असेल.

या सोप्या पद्धतींचा वापर करून तुम्ही तुमच्या गेले सहा महिन्यांची कॉल हिस्ट्री सहजतेने तपासू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharavi: 5 हजार जणांचा जमाव; भडकाऊ पोस्ट व्हायरल अन् गर्दीत बाहेरचे लोक, धारावी मशीद प्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा

Satyapal Malik: "अंबानींची फाईल माझ्याकडं सहीसाठी आली होती, पण..."; सत्यपाल मलिकांचा खळबळजनक खुलासा

...नाहीतर हातपाय तोडू, पाकिस्तानी चित्रपट 'द लिजेंड ऑफ मौला जट' विरोधात MNS आक्रमक, थेट धमकीच दिली

Dharavi Mosque: धारावी मशीद प्रकरण; बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी समितीला 8 दिवसांची मुदत, अन्यथा...

Zero to hero! शुभमन गिलने भारी पराक्रम नोंदवला, आपला Rishabh Pant ही विक्रमाच्या बाबतीत मागे नाही राहिला

SCROLL FOR NEXT