Car Colour for You eSakal
विज्ञान-तंत्र

Car Colour : कोणत्या रंगाची कार आहे तुमच्यासाठी परफेक्ट? ज्योतिषाला विचारण्याऐवजी हे वाचा!

तुम्ही कोणत्या भागात राहता यानुसार कारचा रंग ठरवलात, तर गाडीचं आयुष्यही वाढेल.

Sudesh

नवीन गाडी घेताना तिचा रंग कोणता असावा याबाबत बऱ्याच लोकांमध्ये संभ्रम असतो. त्यात कुटुंबातील प्रत्येकाची आवड वेगळी असल्यामुळे याबाबत वादही निर्माण होतात. मग हे वाद टाळण्यासाठी लोक ज्योतिषाकडे जातात. मात्र, तुम्हाला असं काहीही करण्याची गरज नाही. कारण, तुमच्यासाठी कोणत्या रंगाची गाडी योग्य ठरेल याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

तुमच्यासाठी कोणत्या रंगाची गाडी (How to choose Car Colour) योग्य ठरेल, हे खरंतर तुम्ही कुठे राहता आणि गाडीचा वापर किती आहे यावरून ठरवता येतं. या दोन गोष्टी लक्षात घेऊन निर्णय घेतला, तर तुमच्या गाडीचं आयुष्यही वाढतं.

राहण्याची जागा

गाड्यांमध्ये सर्वाधिक पसंती काळ्या आणि पांढऱ्या रंगाला असते. तुमच्यासाठी यातील कोणत्या रंगाची गाडी योग्य ठरेल, हे तुम्ही कोणत्या भागात राहता यावर ठरतं. तुम्ही जर थंड प्रदेशात राहत असाल, तर तुमच्यासाठी काळ्या रंगाची गाडी योग्य ठरते. कारण, काळा रंग जास्त उष्णता शोषून घेतो. जर तुम्ही उष्ण प्रदेशात राहत आहात, तर काळ्या रंगाची गाडी भरपूर गरम होऊन लवकर खराब होऊ शकते.

उष्ण प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींसाठी पांढऱ्या रंगाची कार योग्य ठरते. उन्हामध्ये ही लवकर गरम होत नाही. अर्थात, बराच वेळ उन्हात राहिल्यामुळे काही वर्षांनी पांढरा रंग बदलून थोडा पिवळसर वाटू लागतो. पांढऱ्या रंगाची गाडी नको असेल, तर उष्ण प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींसाठी सिल्व्हर हादेखील एक चांगला पर्याय आहे. हा रंग लवकर गरम होत नाही, तसंच दिसायलाही स्टायलिश दिसतो.

लाल रंग

गाड्यांमध्ये लाल रंग हा मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक अशा दोन्ही स्वरुपात येतो. लाल रंगाच्या गाड्या अगदी सुंदर आणि स्पोर्टी दिसतात. हा रंग तुम्ही कोणत्याही हवामानात वापरू शकता. यामुळेच जवळपास सर्व कंपन्या लाल रंगाचा पर्याय नक्कीच देतात.

मेटॅलिक रंग

मेटॅलिक रंग, मग तो कोणताही असो खासच दिसतो. मात्र, नॉन मेटॅलिकच्या तुलनेत हे रंग महाग असतात. या रंगांचं तापमानही नॉन मेटॅलिक रंगांच्या तुलनेत अधिक असतं. त्यामुळे उष्ण भागांमध्ये नॉन मेटॅलिक रंगांना अधिक पसंती दिली जाते.

वापर किती?

तुमच्या कारचा वापर किती आहे यानुसारही तुमच्या रंगाची निवड बदलू शकते. जर तुम्ही अगदी कमी प्रमाणात कारचा वापर करणार असाल, तर कोणत्याही रंगाची गाडी तुम्ही घेऊ शकता. मात्र जर तुमचा वापर भरपूर असेल; तर पांढरा, सिल्व्हर किंवा लाल यांपैकी एक रंग तुमच्यासाठी योग्य ठरेल.

हे रंग लवकर गरम होत नसल्यामुळे, कारचं मायलेज चांगलं राहतं. तसंच, यावर स्क्रॅच पडल्यास नवीन रंग आणि जुना रंग सहज मॅच होतो. काळ्या किंवा कोणत्याही मेटॅलिक रंगाच्या बाबतीत हे होत नाही. या गाड्यांना स्क्रॅच पडल्यास नवीन रंग आणि जुना रंग यांमधील फरक दिसून येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT