How to Choose Your Preferred BSNL Mobile Number Online esakal
विज्ञान-तंत्र

BSNL VIP Number: एकदम भारी! BSNLचा फॅन्सी मोबाईल नंबर निवडा, ते ही अगदी फ्री, कशी करायची ऑनलाईन प्रोसेस? वाचा एका क्लिकवर

BSNL Preferred Mobile Number: BSNL तुम्हाला तुमची मनपसंत मोबाइल नंबर निवडण्याची सुविधा देते. जर तुम्हाला तुमच्या नवीन BSNL सिममध्ये तुमचा आवडता नंबर हवा असेल तर तुम्ही कसे करू शकता हे जाणून घ्या.

Saisimran Ghashi

BSNL New Update: भारतातील प्रमुख खाजगी टेलिकॉम ऑपरेटर्स जसे की Airtel, Jio आणि Vi यांनी नुकत्याच केलेल्या रिचार्ज दर वाढीनंतर अनेक ग्राहकांनी त्यांचे नेटवर्क पर्याय BSNL कडे वळवले आहेत. याशिवाय BSNL देशभर आपली 4G सेवा विस्तारित करत आहे. देशभरातील 1000 हून अधिक ठिकाणी आता BSNL ची 4G सेवा उपलब्ध आहे.

तसेच,बीएसएनएलने नुकतेच आपले 5G नेटवर्क टेस्टिंग यशस्वी केले आहे.लवकरच मोबाईल वापरकर्त्यांसाठी 5G नेटवर्क सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

नवीन BSNL सिम घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. BSNL तुम्हाला तुमची मनपसंत मोबाइल नंबर निवडण्याची सुविधा देते. जर तुम्हाला तुमच्या नवीन BSNL सिममध्ये तुमचा आवडता नंबर हवा असेल तर तुम्ही कसे करू शकता हे जाणून घ्या.

BSNL मध्ये तुमचा आवडता मोबाइल नंबर कसा निवडाल?

स्टेप 1: कोणत्याही सर्च इंजिनवर जाऊन 'BSNL Choose Your Mobile Number' सर्च करा.

स्टेप 2: 'cymn' लिंकवर क्लिक करा.

स्टेप 3: तुमचा झोन दक्षिण, उत्तर, पूर्व किंवा पश्चिम यापैकी निवडा आणि तुमचा राज्य निवडा.

स्टेप 4: BSNL नवीन ग्राहकांना मालिका, सुरुवातीचा नंबर, शेवटचा नंबर किंवा संख्यांची बेरीज यासह पसंतीचे नंबर शोधण्याची परवानगी देते. तुम्ही 'फॅन्सी नंबर' टॅबवर क्लिक करून फॅन्सी नंबर देखील तपासू शकता.

स्टेप 5: तुमचा पसंतीचा नंबर निवडल्यानंतर 'नंबर राखीव करा' टॅबवर क्लिक करा.

स्टेप 6: नंबर राखीव करण्यासाठी OTP प्राप्त करण्यासाठी तुमचा सध्याचा नंबर प्रविष्ट करा.

स्टेप 7: तुमचा पसंतीचा नंबर राखीव करण्यासाठी OTP प्रविष्ट करा.

स्टेप 8: तुमचा नंबर राखीव केल्यानंतर तुम्हाला तुमचा पसंतीचा नंबर असलेला BSNL सिम मिळविण्यासाठी जवळच्या BSNL कार्यालयाला भेट द्यावी लागेल.

कंपनीने हे सक्रियकरण थेट आहे की मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) द्वारे आहे हे स्पष्ट केले नाही. BSNL ने या वर्षी मे महिन्यात आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यात आपली 4G सेवा सुरू केली आणि लवकरच ही सेवा संपूर्ण देशात सुरू होण्याची अपेक्षा आहे.

आता तुम्हीही तुमचा मनपसंत BSNL नंबर निवडून 4G चा आनंद घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SSC HSC Exam : मोठी बातमी! बारावीची ११ फेब्रुवारी, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

Kolhapur School Incident: शाळेचं गेट अंगावर पडून विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू! कोल्हापुरात घडली हृदयद्रावक घटना

Ambernath Crime: आईच बनली वैरीण! नवजात बाळाला 17 व्या मजल्यावरुन फेकले, हृदय पिळवटून टाकणारी घटना

पुन्हा चालणार सलमान - करिश्माची जादू; मोठ्या पडद्यावर पुन्हा प्रदर्शित होणार 'बीवी नंबर 1'

Latest Maharashtra News Updates : विधानसभा निकालापूर्वीच घडामोडींना वेग; नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT