how to delete google pay account from stolen or lost phone 
विज्ञान-तंत्र

अँड्रॉइड फोन चोरी गेलाय? मग, असं डिलिट करा तुमचं 'गुगल पे' अकाउंट

सकाळ डिजिटल टीम

सध्या डिजिटल व्यवहारांची (Online Payments) क्रेझ इतकी वाढली आहे की, सर्वजण आता ऑनलाईन पेमेंट्स सर्रास वापरत आहेत. इंटरनेटचा वापर सध्या झपाट्याने वाढला आहे, त्यामुळे भाजीपाला आणि फळांच्या दुकानातही ऑनलाइन पेमेंटला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, या व्यवहारांसाठी, तुमच्या स्मार्टफोनमध्ये डिजिटल पेमेंट अॅप (Digital Payment Apps) असणे आवश्यक आहे. म्हणजेच, ऑनलाइन पेमेंटसाठी, तुमच्याकडे Google Pay, Phone Pay किंवा इतर पेमेंट अॅप्स (Payment App) असणे आवश्यक आहे. पण तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर ही अकाउंट ब्लॉक किंवा डिलीट करणे आवश्यक आहे. असे न केल्यास तुमचे पैसे चोरी केले जाऊ शकतात. (how to delete google pay account from stolen or lost phone)

सामन्यतः पेमेंट बेस्ड कंपन्या वापरकर्त्यांसाठी अतिरिक्त सिक्युरिटी ब्लॅकंट ऑफर करतात. पण तरीही फोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास अशी खाती डिलीट करणे आवश्यक आहे. तुम्ही हे पेमेंट खाते कसे बंद करू शकता ते जाणून घ्या..

गुगल पे (GPay) खाते कसे बंद करावे

तुमचा अँड्रॉइड फोन हरवला असेल तर तुम्हाला तुमच्या इतर फोनवरून 18004190157 नंबर डायल करावा लागेल. यानंतर Other Issues चा पर्याय निवडावा लागेल. यानंतर तुमचा नंबर कस्टमर केअर एजंटशी जोडला जाईल जो तुमचे अकाउंट डिलीट करण्यास मदत करेल.

दुसरा पर्याय देखील वापरून पाहू शकता

याशिवाय तुम्ही इतर पद्धतींचा अवलंब करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या गुगलवर android.com/find ओपन करावे लागेल आणि तुमचे गुगल अकाउंट साइन इन करावे लागेल. Google Find My Device मध्ये, तुम्हाला Play Sound, Secure Device आणि Erase Device यासाठी पर्याय दिसतील. येथे तुम्हाला Erase Device वर क्लिक करावे लागेल. हे केल्यानंतर तुमचा सर्व डेटा आपोआप डिलीट केला जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Usha Vance: अमेरिकन पॉवर झोनमधून कमला यांची एक्झिट, उषा यांची एन्ट्री! भारताशी खास कनेक्शन अन् कोण आहेत? जाणून घ्या

Latest Marathi News Updates live : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी अजून एकाला अटक

Pakistan : पाकिस्तानची स्थिती ढासळली..! सरकारी शाळांतील शिक्षकांना आठ महिन्यांपासून पगार नाही?

Latur Assembly Election 2024 : लातूर विधानसभा यंदाच्‍या विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांवर उमेदवारांची मदार

Ranji Trophy 2024 : Shreyas Iyer, सिद्धेश लाडची सॉलिड सेंच्युरी, मुंबईचा संघ ३०० पार

SCROLL FOR NEXT