Hidden Camera in Hotel eSakal
विज्ञान-तंत्र

Hidden Camera : हॉटेलच्या रुममध्ये हिडन कॅमेरा कसा ओळखाल? कामी येतील या टिप्स

Camera in Hotel Room : सध्या मार्केटमध्ये अगदी छोट्या आकाराचे, तसंच विविध गोष्टींच्या रुपातील हिडन कॅमेरे उपलब्ध आहेत. ऑनलाईन शॉपिंगमुळे तर कोणीही असे कॅमेरे मागवू शकतं.

Sudesh

How to Detect Hidden Camera in Hotel Room : आजकाल कपल्सचे किंवा मुलींचे हॉटेल रुममधील खासगी व्हिडिओ लीक झाल्याच्या बातम्या सातत्याने समोर येतात. कित्येक वेळा अशा प्रकरणांमध्ये ब्लॅकमेलिंग, धमकी देणे असे प्रकारही होतात. यामुळे हॉटेल रुममध्ये चेक-इन केल्यानंतर पहिल्यांदा आजूबाजूला हिडन कॅमेरा आहे का हे तपासणं गरजेचं झालं आहे.

सध्या मार्केटमध्ये अगदी छोट्या आकाराचे, तसंच विविध गोष्टींच्या रुपातील हिडन कॅमेरे उपलब्ध आहेत. ऑनलाईन शॉपिंगमुळे तर कोणीही असे कॅमेरे मागवू शकतं. यामुळेच हॉटेलच्या रुममधील काही गोष्टी बारकाईने तपासणं गरजेचं आहे. यासाठीच आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. (Hidden Camera in OYO)

हिडन कॅमेऱ्याच्या जागा

साधारणपणे हिडन कॅमेरा ठेवण्याच्या काही विशिष्ट जागा असतात. आरशाच्या मागे, पंखा, मोबाईल चार्जर किंवा चार्जिंग पोर्ट, स्मोक डिटेक्टर, शॉवर हेड, वॉल क्लॉक अशा विविध ठिकाणी हिडन कॅमेरा असण्याची शक्यता असते. त्यामुळे हॉटेल रुममध्ये चेक-इन केल्यावर पहिल्यांदा या गोष्टी बारकाईने तपासा. (Hidden Camera locations)

आरसा तपासताना त्यावर एक बोट ठेऊन बघा. जर काचेवरील बोट आणि त्याचं प्रतिबिंब यामध्ये अंतर दिसत असेल, तर तो योग्य आरसा आहे. जर तुमचं बोट आणि आरशातील बोट चिकटल्याप्रमाणे वाटत असेल, तर तो आरसा बारकाईने तपासा. कारण अशी काच पारदर्शक असण्याचा धोका असतो. (How to check two way mirror)

रुममध्ये करा अंधार

वर-वर तपासून झाल्यानंतर एकदा हॉटेल रुमच्या लाईट्स पूर्णपणे बंद करा. अंधार झाल्यानंतर कॅमेरा असू शकतात अशा जागांकडे लक्ष द्या. बहुतांश हिडन कॅमेऱ्यांमध्ये लाल किंवा हिरवी लाईट लागलेली असते. अंधार केल्यामुळे अशी लाईट स्पष्टपणे दिसून तुम्हाला कॅमेरा पकडता येईल. (Hidden Camera in Hotel Room)

आजकाल नवीन येणाऱ्या हिडन कॅमेऱ्यांमध्ये कदाचित अशी लाईट नसू शकते. अशा वेळी तुमच्या मोबाईलचा फ्लॅश तुमची मदत करेल. रुममधील अंधार तसाच ठेऊन मोबाईलचा फ्लॅश सुरू करा, आणि कॅमेरा असू शकतो अशा ठिकाणी तो फिरवा. जर तिथे कॅमेरा लेन्स असेल, तर त्यावरुन प्रकाश रिफ्लेक्ट होईल. अशा वेळी लाईट चमकल्यामुळे तुम्हाला कॅमेरा ओळखू येईल.

अ‍ॅप्स

प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअरवर सध्या बरेच 'हिडन कॅमेरा डिटेक्टर' अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. या अ‍ॅप्सना मिळालेल्या रेटिंग्स किंवा रिव्ह्यू पाहून तुम्ही त्यांपैकी चांगले अ‍ॅप्स शोधू शकता. हे अ‍ॅप्स स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचा वापर करून रुममध्ये लपलेले कॅमेरे ओळखू शकतात. (Hidden Camera Detector Apps)

कॅमेरा डिटेक्टर डिव्हाईस

तुम्ही जर वारंवार हॉटेलमध्ये जात असाल, किंवा कामानिमित्त तुम्हाला वेगवेगळ्या शहरांमधील हॉटेलमध्ये रहावं लागत असेल; तर कॅमेरा डिटेक्टर घेणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. ई-कॉमर्स साईट्सवर तीन-चार हजार रुपयांपासून चांगले कॅमेरा डिटेक्टर डिव्हाईस मिळू शकतात. (Hidden Camera detector tools)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुट्टी

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

Sports Bulletin 14th November: एकाच मॅचमध्ये दोघांची त्रिशतकं, गोव्याचा ऐतिहासिक विजय ते चॅम्पियन्स ट्रॉफी अपडेट्स

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT