WhatsApp Chat esakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp Chat : व्हॉट्सॲपचे जुने चॅट शोधण्यासाठी स्ट्रगल करावा लागणार नाही, फक्त ‘या’ टिप्स करा फॉलो

WhatsApp Chat : व्हॉट्सअ‍ॅप हे एक संवादाचे प्रभावी माध्यम आहे. अगदी प्रत्येक व्यक्तीच्या मोबालईमध्ये या अ‍ॅपचा समावेश हा असतोच.

Monika Lonkar –Kumbhar

WhatsApp Chat : सध्याचा जमाना हा डिजिटलचा आहे. या डिजिटल काळात व्हॉट्सअ‍ॅप हे एक संवादाचे प्रभावी माध्यम बनले आहे. अगदी प्रत्येक व्यक्तीच्या मोबालईमध्ये या अ‍ॅपचा समावेश असतोच. इतर कोणतेही सोशल मीडियावरील अ‍ॅप मोबाईलमध्ये नसले तरी व्हॉट्सअ‍ॅप हमखास असते. कुटुंब, मित्र-मंडळींसोबत जोडले जाण्यासाठी आणि प्रभावी संवादासाठी व्हॉट्सअ‍ॅप हे अ‍ॅप सुलभ ठरत आहे.

या व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक प्रकारचे प्रोफेशनल ग्रुप देखील तयार केले जातात. या अ‍ॅपमध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे फीचर्स मिळतात. ज्यामुळे, तुम्ही एकमेकांना मेसेज, व्हॉईस कॉल आणि व्हिडिओ कॉलही करू शकता. परंतु, आता व्हॉट्सॲपचा वापर हा व्यवसायापासून ते ऑफिसपर्यंत आणि वैयक्तिक पातळीवर होत असल्यामुळे अनेक वेळा चॅटमध्ये काही महत्वाची माहिती लिहिली जाते. ज्याची कधीकधी गरज असते.

मग, ही माहिती शोधण्यासाठी पुन्हा चॅटमध्ये जाऊन ते मेसेजेस स्क्रोल करावे लागतात. हे कदाचित कठीण काम असू शकते. शिवाय, यामध्ये बराच वेळ वाया जाऊ शकतो. परंतु, आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण, आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. ज्या तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही WhatsApp वर जुने चॅट्स सहज शोधू शकता.

तारखेच्या मदतीने असे सर्च करा चॅट

व्हॉट्सॲपमध्ये आता एक नवीन फिचर देण्यात आले आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तारखेच्या मदतीने चॅट शोधू शकता. यासाठी तुम्हाला ज्या कॉन्टॅक्टचा चॅट शोधायचा आहे, त्यावर क्लिक करा.

आता उजव्या बाजूला असलेल्या ३ टिंबांवर क्लिक करा आणि सर्चबारवर जा. सर्चबारवर गेल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला एक लहान कॅलेंडर दिसेल. या कॅलेंडरवर क्लिक करा आणि तारीख टाईप करा. आता या तारखेच्या चॅट काही सेकंदामध्ये तुमच्यासमोर येतील.  

कॉन्टॅक्टच्या नावाने असे करा सर्च

अनेकदा असे घडते की, आपण व्हॉट्सॲपवर बराच काळ एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात नसतो किंवा त्या व्यक्तीसोबत आपले कोणत्याही प्रकारचे चॅट झालेले नसते. अशा परिस्थितीमध्ये मग जुने चॅट्स शोधण्यासाठी खूप खाली स्क्रोल करावे लागते.

परंतु, तुमचे हेच काम सोपे करण्यासाठी तुम्ही सर्वात आधी व्हॉट्सॲप ओपन करा. त्यानंतर, आता तुम्हाला उजव्या बाजूला ३ बिंदू किंवा ठिपके दिसतील. आता त्या सर्च ऑप्शनवर क्लिक करा. तुम्हाला ज्या व्यक्तीसोबतचे चॅट शोधायचे आहे, त्या व्यक्तीचे नाव टाईप करा. त्या व्यक्तीचे नाव समोर आल्यावर त्या चॅटमध्ये जा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT