How to Secure Your Google Account from Unauthorized Users esakal
विज्ञान-तंत्र

Google Account Safety: तुमचं जीमेल अकाऊंट तुमच्या नकळत दुसरं कोणीतरी वापरतंय? एका क्लिकवर मिळवा अलर्ट अन् सोल्यूशन

Google Account Recovery : गुगलच्या हिडन फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या अकाऊंटमध्ये कोणत्या डिव्हाईसवरून लॉग इन केलंय ते अगदी सहजपणे पाहू शकता.

Saisimran Ghashi

Gmail Tech Tips : आपलं गुगल अकाऊंट आपल्यासाठी सर्वात महत्वाचे असते. त्यावर असंख्य माहीती आणि वेगवेगळ्या ठिकाणी लॉगिन असते. पण हेच गुगल अकाऊंट सुरक्षित आहे ना खात्री करायची असेल तर काय कराव हे बऱ्याच लोकांना कळत नाही. गुगल त्यासाठी खास फीचर देतंय. या फीचरच्या मदतीने आपण आपल्या अकाऊंटमध्ये कोणत्या डिव्हाईसवरून लॉग इन केलंय ते अगदी सहजपणे पाहू शकता. इतकंच नाही तर अज्ञात डिव्हाईस आढळल्यास त्या ठिकाणाहून लॉगआउट सुद्धा करता येतं.

आपल्या डिजिटल सुरक्षेसाठी सतत आपले गुगल अकाऊंट तपासत राहणे आणि अज्ञात डिव्हाईसवरुन लॉगिन दिसल्यास डिलीट करणे देखील गरजेचे आहे. याच्यासाठी तुम्हाला पुढील गोष्टी कराव्या लागतील.

स्टेप 1 : आपल्या Android फोनच्या सेटिंग्जमध्ये जा आणि 'Google' या पर्यायावर टॅप करा.

स्टेप 2 : आता 'Manage your Google account' या पर्यायावर टॅप करा.

स्टेप 3 : स्क्रीनच्या वरच्या बाजूला दाखवलेल्या पर्यायांच्या यादीत 'Security' या पर्यायावर येईपर्यंत डावीकडे स्लाइड करा.

स्टेप 4 : खाली स्क्रोल करा आणि 'Your devices' या पर्यायावर टॅप करा.

स्टेप 5 : आता 'Manage all devices' या पर्यायावर पुन्हा एकदा टॅप करा. या ठिकाणी आपल्या गुगल अकाऊंटमध्ये कोणकोणत्या डिव्हाईसवरून लॉग इन झालंय ते तुम्ही पाहू शकता.

स्टेप 6 : जर तुम्हाला अज्ञात डिव्हाईस आढळलं तर त्या डिव्हाईसवर टॅप करा.

स्टेप 7 : आता 'Sign out' या पर्यायावर टॅप करून त्या डिव्हाईसवरून लॉगआउट करा.

अधिक सुरक्षितता कशी वाढवायची?

अज्ञात डिव्हाईसवरून लॉगआउट केल्यानंतर गुगल अकाऊंटचा password जरूर बदला.

2-Step Verification हा पर्याय सुरु करा. यामुळे लॉग इन करताना password व्यतिरिक्त तुम्हाला रीकवरी पासवर्ड फोनवर पाठवला जाणारा verification code किंवा Security Key वापरावा लागेल.

ज्या डिव्हाईसवरून तुम्ही नेहमी लॉग इन करता त्या डिव्हाईसवर 2-Step Verification सुरु करणे आवश्यक नाही. ते डिव्हाईस 'Trusted Device' म्हणून मार्क करा. यामुळे त्या डिव्हाईसवर प्रत्येक वेळी verification code घालण्याची गरज नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur School: कोल्हापुरात मनपा शाळेत पालकांचा गोंधळ; ‘यह मत कहो खुदा से’ प्रार्थनेवर घेतला आक्षेप

IND vs AUS: ते असतील हुशार, पण...! पॅट कमिन्सने दिले टीम इंडियाला ओपन चॅलेंज, वाचा काय म्हणाला

Assembly Election: बारामतीत घड्याळ की तुतारी? कोणते मुद्दे ठरणार वरचढ? कोण जिंकणार गड? वाचा सविस्तर...

Heavy Earrings Tips: वजनदार कानातले घालून कानात होणार नाही वेदना, फॉलो करा 'या' ट्रिक्स

Exit Poll: एक्झिट पोलबाबत संजय राऊत खरंच बोलले, कारण..... शायना एनसी यांनी केला 'हा' दावा

SCROLL FOR NEXT