व्हॉट्सअॅप आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनलाय.कुठेही फोटो पाठवायचे असो, किंवा आणखी काही पाठवायचे असो किंवा लाइव्ह लोकेशन असो, सगळी कामे व्हॉट्सअॅपवर सहज होतात. व्हॉट्सअॅपवर कोणताही मेसेज, मीडिया फाइल, लिंक फॉरवर्ड करणेही अत्यंत सोपे आहे पण तुम्ही अनुभवले असेल की फोटो फॉरवर्ड केल्यावर त्याचे कॅप्शन काढून टाकले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही व्हॉट्सअॅपवर कॅप्शनसह कोणताही फोटो फॉरवर्ड करू शकता. होय, एक सोपी ट्रिक्स आहे ज्याच्या मदतीने युजर्स कोणताही फोटो कॅप्शनसह फॉरवर्ड करू शकतील. (how to forward photo with caption check here trick)
तुम्हीही फोटो फॉरवर्ड करताना नेहमी पुन्हा कॅप्शन लिहित असाल किंवा फोटो फॉरवर्ड करताना कॅप्शन गायब होऊ नये म्हणून मार्ग शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला आज सोपी ट्रिक्स सांगत आहोत. त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
स्टेप 1- यासाठी आधी व्हॉट्सअॅप ओपन करा आणि त्यानंतर तुम्हाला जो फोटो फॉरवर्ड करायचा आहे त्या फोटोवर जा.
स्टेप 2- इमेज प्रेस करा आणि धरून ठेवा. यानंतर तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला 'रिप्लाय', 'स्टार', 'डिलीट', 'शेअर' आणि 'फॉरवर्ड' असे अनेक आयकॉन दिसतील.
स्टेप 3-त्यातील 'शेअर आयकॉन' वर टॅप करा. लक्षात घ्या 'फॉरवर्ड' आयकॉनवर टॅप करण्याची गरज नाही.
स्टेप 4- 'शेअर' आयकॉनवर टॅप केल्यानंतर तुम्हाला सर्व सोशल मीडिया आणि इतर अॅप्सचा पर्याय दिसेल. येथे 'WhatsApp' आयकॉन सिलेक्ट करा.
स्टेप 5- त्यानंतर तुम्हाला ज्या चॅट किंवा ग्रुपवर इमेज पाठवायची आहे त्यावर टॅप करा आणि नंतर उजवीकडे तळाशी असलेल्या 'टिक बटन' वर टॅप करा.
स्टेप 6- यानंतर, तुम्हाला पाठवण्यापूर्वी फोटो आणि कॅप्शन एडीट करण्याचा पर्याय मिळेल.
महत्त्वाची गोष्ट- या ट्रिकचा वापर करताना एक नियम आहे की तुम्ही या प्रोसेसचा वापर करून एकावेळी फक्त एकच फोटो कॅप्शनसह फॉरवर्ड करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.