jeevan pramaan digital life certificate process and benefits esakal
विज्ञान-तंत्र

Jeevan Pramaan Cetificate : पेन्शनधारकांसाठी महत्वाचं! जीवन प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सोपी प्रोसेस करा एका क्लिकमध्ये..

Jeevan Pramaan Life Certificate For Pensioners Online Process : नोव्हेंबर 2021 पासून निवृत्तीधारकांना फेस ऑथेंटिकेशनद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा मिळाली आहे.

Saisimran Ghashi

Life Certificate Jeevan Pramaan : निवृत्तीधारकांसाठी केंद्र व राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘जीवन प्रमाण’ या डिजिटल सेवा उपक्रमामुळे निवृत्तीधारकांचा मोठा प्रश्न सुटला आहे. याआधी निवृत्तीधारकांना दरवर्षी बँक किंवा इतर पेंशन वितरक संस्थांकडे प्रत्यक्ष जाऊन जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागायचे. ही प्रक्रिया वृद्ध व्यक्तींसाठी वेळखाऊ आणि कष्टदायक होती. परंतु ‘जीवन प्रमाण’ सेवेने ही प्रक्रिया डिजिटल केल्यामुळे आता निवृत्तीधारकांना घरबसल्या ऑनलाइन जीवन प्रमाणपत्र सादर करता येते.

'जीवन प्रमाण' सेवा कशी कार्य करते?

नोव्हेंबर 2021 पासून निवृत्तीधारकांना त्यांच्या Android स्मार्टफोनचा वापर करून फेस ऑथेंटिकेशनद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा मिळाली आहे. यात निवृत्तीधारकांना बँका किंवा सेवा केंद्रांना भेट देण्याची गरज उरलेली नाही. हे तंत्रज्ञान बायोमेट्रिक्सवर आधारित असून, निवृत्तीधारकांना अधिक सोयीस्कर आणि सुलभ बनवते. (Jeevan Pramaan Cetificate)

जीवन प्रमाणपत्र कधी सादर करावे?

निवृत्तीधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र बँका, पोस्ट ऑफिस किंवा अन्य पेंशन वितरक संस्थांना दिल्यानंतरच निवृत्ती वेतन नियमितपणे त्यांच्या खात्यात जमा होते.

जीवन प्रमाणपत्र कुठून मिळवायचं?

जीवन प्रमाणपत्र मिळवण्यासाठी निवृत्तीधारकांना विविध पर्याय उपलब्ध आहेत.(Life Certificate)

नागरिक सेवा केंद्रे (CSC): देशभरातील विविध नागरिक सेवा केंद्रांवर जाऊन जीवन प्रमाणपत्र तयार करता येते.

जीवन प्रमाण पोर्टल: निवृत्तीधारकांना त्यांच्या अंगठ्याचे बायोमेट्रिक स्कॅनरद्वारे प्रमाणपत्र सादर करता येते.

जीवन प्रमाण मोबाइल अॅप: या अॅपद्वारे निवृत्तीधारक घरबसल्या प्रमाणपत्र तयार आणि सादर करू शकतात.

पेंशन वितरक कार्यालये: पोस्ट ऑफिस, बँका, ट्रेझरी आदी ठिकाणी जाऊनही जीवन प्रमाणपत्र मिळवता येते.

‘डोअरस्टेप बँकिंग’ सेवा: ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांना हालचालीच्या अडचणी आहेत, त्यांच्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील काही बँका ‘डोअरस्टेप बँकिंग’ सेवा पुरवतात. यात घरपोच जीवन प्रमाणपत्र सादर करता येते.

पोस्टमनद्वारे सेवा: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या ‘पोस्टमनद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची’ सेवा उपलब्ध आहे. यासाठी ‘पोस्टइन्फो अॅप’ डाउनलोड करून सेवा वापरता येते.

‘जीवन प्रमाण’ उपक्रमाचे महत्त्व

मोदी सरकारने या डिजिटल जीवन प्रमाणपत्र उपक्रमाचा जोरदार प्रचार केला आहे. 2022 आणि 2023 मध्ये सुरू केलेल्या विशेष मोहिमांमुळे लाखो निवृत्तीधारकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे. नोव्हेंबर 2024 पासून आणखी एका विशेष मोहिमेची सुरुवात होणार असून, यामध्ये फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाद्वारे अधिकाधिक निवृत्तीधारकांना या सुविधेचा लाभ मिळवून देण्याचा उद्देश आहे.(Life Certificate Jeevan Pramaan)

‘जीवन प्रमाण’ या डिजिटल सेवेमुळे निवृत्तीधारकांचा वेळ आणि कष्ट वाचत आहेत. तसेच, पेंशन वितरण प्रक्रियाही अधिक गतिमान आणि सोयीस्कर झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT