Fancy Number Plate eSakal
विज्ञान-तंत्र

Fancy Number Plate : कारसाठी फॅन्सी नंबर कसा मिळवाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

VIP Number Process : तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, मात्र अशा फॅन्सी नंबर्सचा लिलाव होतो. यातून सगळ्यात जास्त बोली लावणाऱ्या व्यक्तीला तो नंबर मिळतो.

Sudesh

How to get VIP Number Plate : नवीन कार घेतल्यानंतर त्यासाठी फॅन्सी नंबर मिळावा अशी कित्येकांची इच्छा असते. विशेषतः मध्यमवर्गीय लोकांसाठी कार किंवा बाईक घेणं हे एक स्वप्न पूर्ण होण्यासारखं असतं. त्यामुळेच आपल्या लाडक्या गाडीचा नंबरही युनिक असावा अशी इच्छा लोकांची असते. कार आणि बाईक लव्हर्स जास्त पैसे देऊन असे फॅन्सी नंबर्स मिळवतात.

हे फॅन्सी नंबर कसे मिळतात याबाबत कित्येकांना माहिती नसते. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, मात्र अशा फॅन्सी नंबर्सचा लिलाव होतो. यातून सगळ्यात जास्त बोली लावणाऱ्या व्यक्तीला तो नंबर मिळतो. या ई-लिलावाची प्रक्रिया कशी असते? त्यामध्ये कसा सहभाग घेता येतो? जाणून घेऊया.

काय आहे प्रक्रिया?

  • यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी रस्ते परिवाहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या (MoRTH) अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

  • याठिकाणी पब्लिक यूजर म्हणून लॉगइन आणि रजिस्टर करा.

  • यानंतर साईन-अप प्रक्रिया पूर्ण करुन आपल्या अकाउंटमध्ये लॉग-इन करा.

  • यानंतर फॅन्सी नंबर (Fancy Number) निवडा.

  • यानंतर रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक शुल्क भरुन आपला नंबर रिझर्व्ह करा.

  • यानंतर आपल्या आवडीच्या व्हीआयपी नंबरसाठी बोली लावा.

  • लिलाव प्रक्रिया संपल्यानंतर विजेत्यांची घोषणा केली जाते. तुमची बोली सर्वाधिक असेल, तर बाकीची रक्कम भरून तुम्ही नंबर मिळवू शकता.

  • तुम्हाला अलॉटमेंट झाली नाही, तर रजिस्ट्रेशन करताना भरलेलं शुल्क तुम्हाला परत मिळेल.

प्रत्येक राज्यांमध्ये व्हीआयपी कार नंबरसाठी एक बेस प्राईज ठरलेली असते. बोली या बेस प्राईजपासूनच सुरू होते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज भासत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT