how to use whatsapp chat lock and hide feature esakal
विज्ञान-तंत्र

Whatsapp Chat Lock : व्हॉट्सॲपचे पर्सनल चॅट लपवायचे आहेत? असं वापरा ॲपमधलं चॅट लॉक आणि हाईड फिचर

Whatsapp Chat Hide Feature : चॅट लॉक फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या खासगी चॅट्सना फिंगरप्रिंट, फेस लॉक किंवा पासवर्डच्या आधारे लपवून ठेवू शकता. व्हॉट्सॲप तुम्हाला या लॉक केलेल्या फोल्डरलाही सीक्रेट कोडच्या आधारे लपवण्याची सुविधाही देते. (how to use whatsapp chat lock and hide feature)

Saisimran Ghashi

Whatsapp New Feature : व्हॉट्सॲप आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहे. त्यावर केवळ मित्र आणि कुटुंबाशीच नाही तर, कामाशी संबंधित संवादही आपण करतो. पण याच व्हॉट्सॲप चॅटमध्ये अनेकदा आपली खासगी माहिती असते, जी आपण इतरांशी सहजासहजी कोणाशीही शेअर करू इच्छित नसतो. तुमचा फोन एखाद्या मित्र किंवा नातेवाईकाच्या हाती गेला तर? अशा वेळी तुमच्या खासगी चॅट्सना कशा प्रकारे लपवून ठेवता येईल हे जाणून घ्यायच असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

आपल्या वापरकर्तांच्या सुरक्षेची हमी घेण्यासाठी व्हॉट्सॲपने आधीच एंड-टू-एंड एन्क्रिप्शनची सुविधा दिली आहे. जेणेकरून मेसेज पाठवताना त्यांची माहिती कोणीही वाचू शकणार नाही. पण जर तुम्ही तुमचा फोन इतराना सहजासहजी कोणाही हाती देत असाल तर? अशा परिस्थितीसाठी व्हॉट्सॲपपने आणखी एक खास फीचर दिला आहे ते म्हणजे चॅट लॉक.

या चॅट लॉक फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या खासगी चॅट्सना फिंगरप्रिंट, फेस लॉक किंवा पासवर्डच्या आधारे लपवून ठेवू शकता. अगदी खास म्हणजे, व्हॉट्सॲप तुम्हाला या लॉक केलेल्या फोल्डरलाही सीक्रेट कोडच्या आधारे लपवण्याची सुविधा देते. त्यामुळे तुमच्या चॅट्स इतक्या लपून राहतात की त्यांचा शोधही लागणार नाही. फक्त तुम्हीच तुमच्या सीक्रेट कोडच्या आधारे त्या पुन्हा पाहावू शकाल.

हे फीचर तुम्हाला आवडले आणि तुमच्या खासगी चॅट्सना कशा प्रकारे लपवता येईल याची माहिती हवी असल्यास, वाचा सोप्या पद्धती...

  • व्हॉट्सॲप उघडा आणि ज्या चॅटला लपवायचंय त्या चॅटवर क्लिक करा.

  • ओपन झालेल्या मेनूमधून 'लॉक चॅट' निवडा.

  • 'कंटिन्यू' वर क्लिक करा आणि तुमचा फिंगरप्रिंट किंवा फेस लॉक लावून पुष्टी द्या. आता तुमची खासगी चॅट लॉक झालेल्या फोल्डरमध्ये सुरक्षित आहे.

फक्त लॉक करणे पुरेसे नाही. आता हा लॉक झालेला फोल्डर लपवायचा आहे तर पुढील स्टेप्स फॉलो करा

लॉक झालेला फोल्डर लपवण्याची पद्धत

लॉक झालेला फोल्डर उघडा. वरच्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा.

'चॅट लॉक सेटिंग्ज' निवडा.

'सीक्रेट कोड' वर टॅप करा आणि तुमच्या आवडीचा कोड टाका. हा कोड तुम्हाला तुमच्या लॉक झालेल्या चॅट्समध्ये पुन्हा नेणार.

'नेक्स्ट' वर क्लिक करा, पुन्हा एकदा कोड टाका आणि 'डन' वर टॅप करा.

'हाइड लॉक चॅट्स' पर्याय चालू करा. आता तुमचा लॉक झालेला फोल्डर व्हॉट्सॲपच्या होम स्क्रीनवर दिसणार नाही.

लॉक झालेला फोल्डर उघडण्यासाठी व्हॉट्सॲपच्या होम स्क्रीनवर तुमचा 'सीक्रेट कोड' सर्च बारमध्ये टाका.

आता तुमच्या खासगी चॅट्स पूर्णपणे लपवल्या जातील. कोडशिवाय कोणीही त्या शोधू शकणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: ''विनोद तावडे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्यावर हल्ला झालाय'' फडणवीस अखेर बोललेच

Vinod Tawde Video: ''हितेंद्र ठाकूर यांनी मला गाडीमध्ये सगळं सांगितलंय'' भाजप नेत्याने टीप दिल्याच्या आरोपावर तावडे स्पष्टच बोलले

यंदा 70 टक्क्यांहून अधिक होईल मतदान! 2014 मध्ये 10.49 लाख तर 2019 मध्ये 12.16 लाख मतदारांनी केले नाही मतदान; 5 वर्षांत सोलापुरात वाढले 4.14 लाख मतदार

Vinod Tawde: ''अप्पा मला वाचवा!'' विनोद तावडेंनी खरंच 'तो' मेसेज केला का?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT