Cyber Crime esakal
विज्ञान-तंत्र

Cyber Crime : कोणी तुमची स्क्रीन रेकॉर्ड तर करत नाही ना? ओळखा या साइन्सने

अँड्रॉइड फोन्स आल्यापासून सायबर क्राइमच्या केसेस वाढत आहेत. पण बऱ्याचदा ते कसे ओळखावे हेच आपल्याला कळत नाही.

सकाळ डिजिटल टीम

How To Identify That Smart Phone Screen Is Recording : अँड्रॉइड फोन्स आल्यापासून सायबर क्राइमच्या केसेस वाढत आहेत. पण बऱ्याचदा ते कसे ओळखावे हेच आपल्याला कळत नाही. हॅकर्स लोकांना फसवण्यासाठी रोज नवनवीन पध्दती शोधत राहतात. त्यामुळे आपला डेटा चोरीला जातो. हल्ली स्मार्ट फोन म्हणजे ऑल इन वन झाला आहे. त्यामुळे आपल्या जोडीदाराला माहित नसेल एवढे सर्व महत्वपूर्ण गोष्टी या आपल्या फोन मध्ये असतात. बँक अकांउंटपासून महत्वाचे कागदपत्र सर्वच.

त्यामुळे जर तुमचा फोन हॅक झाला असेल तर तुम्हाला ते माहित असणे आवश्यक आहे. त्यापैकीच एक स्क्रीन रेकॉर्डींग आहे. यात हॅकर्स स्पायवेअरच्या मदतीने फोन ऑन करतात. स्पायवेअर तुमची स्क्रीन तुमच्या नकळत रेकॉर्ड करून डेटा हॅकर्सना पाठवत असतो.

स्क्रीन रेकॉर्ड होतेय, कसं ओळखावं?

  • स्मार्टफोन्समध्ये असे काही फीचर्स असतात की, जे तुमचे कोणतेही सेंसिटिव्ह फीचरच्या सुरू झाल्याची माहिती देतात.

  • उदा. तुम्ही कॅमेरा ऑन केला की, कॅमेऱ्याच्या लोगोसोबत एक ग्रीन लाइट दिसतो. माइकसोबतपण असंच काही होतं.

  • तसंच जर स्पायवेअर लपून छपून तुमचा फोन रेकॉर्ड करत असेल तर नोटीफिकेशन बारमध्ये एका ब्रॅकेटमद्ये एक कॅमेऱ्याचं साइन दिसेल.

  • हा आयकॉन ब्लिंक होत राहतो. जेणेकरून तुमचं तिकडे लक्ष जाईल. यावरून तुमची स्क्रीन रेकॉर्ड होतेय का हे ओळखू शकाल.

हे बंद कसं कराल?

  • हे बंद करण्यासाठी तुम्हाला सर्व संशयास्पद अ‍ॅप्समधून कॅमेरा आणि रेकॉर्डिंगच्या सर्व परमीशन रिमूव्ह करणं गरजेचं आहे.

  • काही वेळा यूझरला आपली स्मार्टफोन फॅक्ट्री रिस्टोर करायला हवं. याचे काही इतर लक्षणंही दिसतात.

  • बॅटरी वेगात संपणे.

  • अननोन अ‍ॅप्स इंस्टॉल होणं.

  • डेटा वेगात संपणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT