Phone Hack Signs: टेक्नोलॉजीमुळे अनेक गोष्टी सोप्या तर झाल्या आहेत, मात्र दुसरीकडे टेक्नोलॉजीचा वापर करून ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण देखील वाढले आहे. अशीच एक ऑनलाइन फसवणुकीची घटना गुजरात येथील व्यक्तीसोबत घडली आहे. मेहसाणा येथील ४२ वर्षीय व्यक्तीला तब्बल ३७ लाख रुपयांना गंडा बसला आहे.
व्यक्तीने पैसे काढल्याचा मेसेज आल्यानंतर बँक खाते फ्रीज करण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु, यूजरनेम आणि पासवर्ड चुकीचा असल्याचा मेसेज आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यक्तीचा फोन हॅक करण्यात आला होता. त्यानंतर बँकिंग माहिती चोरी करण्यात आली. तुमच्यासोबत देखील अशी घडना घडू शकते. तुमचा फोन हॅक झाला की नाही, हे सहज जाणून घेऊ शकता.
फोन वारंवार हँग होणे
तुमचा फोन वारंवार हँक अथवा लॅग होत असल्यास अथवा स्लो झाला असल्यास डिव्हाइस हॅक झाल्याची शक्यता आहे. तुमच्या फोनमध्ये मॅलवेअर देखील असू शकतो.
बॅटरी लवकर संपणे
फोनची बॅटरी लवकर संपत असल्यास हे हॅकिंगचे संकेत असू शकतात. हॅकर्स फोनमधील माहिती मॅलवेअरच्या मदतीने चोरतात. त्यामुळे बॅटरी नेहमीच्या तुलनेत लवकर डाउन होते.
डेटा लवकर संपणे
फोनचा वापर न करताही डेटा लवकर संपत असल्यास ही हॅकिंगची लक्षणं आहेत. तुमच्या फोनमध्ये स्पायवेअर असल्यास मेन सर्व्हरपर्यंत डेटा ट्रान्सफर करण्यासाठी इंटरनेटचा वापर केला जातो. यामुळे तुमच्या फोनमधील डेटा लवकर संपतो.
फोन जास्त गरम होणे
स्मार्टफोन अचानक गरम होणे, वारंवार ऑन-ऑफ होणे हे देखील हॅकिंगचे संकेत आहेत. तुमच्या फोनमध्ये देखील हे संकेत दिसत असतील, तर त्वरित डिव्हाइस तपासा.
अॅप्स आपोआप डाउनलोड होणे
तुमच्या फोनमध्ये अॅप्स आपोआप डाउनलोड होत असल्यास डिव्हाइसमध्ये मॅलवेअर अथवा स्पायवेअर असण्याची शक्यता आहे. तुमच्या फोनमध्ये हे संकेत दिसत असल्यास डिव्हाइस हॅक झाल्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त इतरही समस्या असू शकतात.
हेही वाचा: ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.