How to Use Two Mobile Numbers with One WhatsApp App esakal
विज्ञान-तंत्र

Whatsapp Update : एकाच व्हॉट्सॲपमधे करा दोन नंबरवरुन लॉगिन,जाणून घ्या कसं वापरायचं हे फीचर

Saisimran Ghashi

Whatsapp Feature Tips : व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी मोठी खुशखबर आहे. आता एकाच व्हॉट्सॲप अॅपमध्ये दोन वेगवेगळे मोबाईल नंबर वापरता येणार आहेत. याआधी वेगवेगळ्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप वापरण्यासाठी ड्युअल ॲप किंवा क्लोन ॲपचा वापर करावा लागत होता. पण आता ही अडचण दूर झाली आहे.

वापरकर्त्यांच्या सोयीसाठी व्हॉट्सॲप सतत काहीतरी नवीन फीचर्स आणत असतो. चॅट लॉक, हाय डेफिनिशन फोटो ऑप्शन, मेसेज एडिट करण्याची सुविधा, स्क्रीन शेअरिंग,मेटा एआय यांसारखे अनेक महत्वाचे फीचर्स व्हॉट्सॲपने आतापर्यंत दिले आहेत. आता त्यामध्ये एकाच व्हॉट्सॲप अॅपमध्ये दोन वेगवेगळे मोबाईल नंबर वापरण्याची सुविधा वापरता येणार आहे.

याआधी वेगवेगळ्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप वापरण्यासाठी ड्युअल ॲप किंवा क्लोन ॲपचा वापर करावा लागत होता किंवा मग पर्याय म्हणून लोक बिसनेस व्हॉट्सॲपचा वापर करतात. त्यामुळे आता ही गोष्टी सोपी होणार आहे. वेगवेगळ्या क्रमांकांवर लोकांशी संपर्क साधता येणे आता अधिक सोयीस्कर होणार आहे.

हे फीचर कसे वापराल?

दुसरे व्हॉट्सॲप अकाउंटचे सेटअप प्रक्रिया अगदी सोपी आहे. यासाठी तुमच्याकडे दुसरा मोबाईल नंबर आणि सिमकार्ड असणे गरजेचे आहे. किंवा तुमच्या फोनमध्ये मल्टी-सिम किंवा ई-सिम ची सुविधा असणेही चालेल. या गोष्टी उपलब्ध असल्यावर खालील सोप्या पद्धतीने तुम्ही दुसरे अकाउंटची सेटअप करू शकता.

स्टेप 1 : व्हॉट्सॲपच्या सेटिंग्जमध्ये जा आणि तुमच्या नावाच्या बाजूला असलेल्या बाणावर टॅप करा.

स्टेप 2 : आता "Add account" (अकाउंट जोडा) ची निवड करा. या स्टेपने तुमच्या दुसऱ्या अकाउंटची सेटअप प्रक्रिया सुरु होईल.

व्हॉट्सॲपने खूप आधीच हे फीचर सगळ्यांसाठी खुले केले आहे. पान बहुतांशी लोकांना त्या बद्दल माहिती नसते. सध्या व्हॉट्सॲपच्या बीटा टेस्टर्सना ही सुविधा वापरण्यास सुरुवात झाली आहे. ही सुविधा सर्वप्रथम व्हॉट्सॲपच्या Android व्हर्जनसाठी येणार आहे. iOS व्हर्जनसाठी ही सुविधा रिलीज होईल.

व्हॉट्सॲपच्या ऑफिशियल ब्लॉगवर दिलेल्या माहितीनुसार, तुमच्या प्रत्येक अकाउंटच्या प्रायव्हसी आणि नोटिफिकेशन सेटिंग्जवर तुमचा पूर्ण कंट्रोल असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT