Friendship Day Wishes AI Photos and Stickers making Tricks esakal
विज्ञान-तंत्र

Friendship Day 2024 : व्हॉट्सॲप AI वापरुन फ्रेंडशिप डे शुभेच्छांना बनवा आणखी खास; स्टीकर्स अन् फोटो बनवायच्या सोप्या ट्रिक्स

Whatsapp Meta AI Friendship Day Stickers : व्हॉट्सॲपवर फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत? टेक्नॉलॉजी कधी कामी येणार? मेटा एआयवर बनवा हवे ते स्टीकर्स अन फोटो,कसं वापरायचं जाणून घ्या एका क्लिकवर

Saisimran Ghashi

Happy Friendship Day Wishes Using AI : आपल्या सर्वांना माहिती आहेच की दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या रविवारी आपण "फ्रेंडशिप डे" साजरा करतो. मैत्री दिन हा आपल्या जीवनातला एक खास दिवस असतो. हा दिवस आपल्या मित्रांच्या प्रेमाची साथ घेऊन आनंदाने साजरा करण्याचा दिवस असतो. प्रत्यक्षात एकत्र येऊन साजरा करणं म्हणजे खास असतं. पण आपल्या सर्वांनाच कामाच्या गडबडीत फक्त व्हॉट्सॲपचं शुभेच्छा देणं शक्य असतं. मग यावेळी टेक्नॉलॉजी आपल्या मदतीला येते. फ्रेंडशिप डे स्टिकर्स, सुंदर मेसेजेस आणि इतर गोष्टींद्वारे आपल्या मित्रांना हा दिवस एकदम स्पेशल बनवून देऊ शकता.

WhatsApp वर फ्रेंडशिप डे स्टिकर्स कसे बनवायचे?

मेटाने आपल्या व्हॉट्सअॅपवर अनेक फ्रेंडशिप-थीम असलेले स्टिकर पॅक्स दिले आहेत. जसे "बुक्स & बेस्ट फ्रेंड्स", "बेस्ट फ्रॉग फ्रेंड्स", "फ्रेंड्स आर फॅमिली" इत्यादी. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सहजतेने ते डाउनलोड करून तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता.

Whatsapp AI Friendship Day Stickers

मेटातून नवीन इमेजेस आणि स्टिकर्स तयार करायचे?

व्हॉट्सॲपवर मेटाहून तुम्ही नवीन इमेजेस आणि स्टिकर्स तयार करून पाठवू शकता. तुमच्या मजेशीर कल्पनेने लिहिलेल्या टेक्स्ट प्रॉम्प्टद्वारे तुम्ही युनिक आणि हाय क्वालिटी इमेजेस मिळवू शकता. "हायपर रिअलिस्टिक" सारखे किवर्ड वापरा किंवा "टॉम आणि जेरी फ्रेंडशिप डे साजरा करताना" असा टेक्स्ट प्रॉम्प्ट वापरा. तुम्ही यातून बनवलेली इमेज आवडली नाही तर तुम्ही मेटाला पुन्हा स्पेशल टेक्स्ट प्रॉम्प्ट देऊन ती इमेज बदलूही शकता.

Friendship Wishes Stickers Using AI

फ्रेंडशिप डे ला व्हॉट्सॲपवर स्टिकर्स आणि इमेजेस तयार करण्यासाठी काही उपयुक्त टेक्स्ट प्रॉम्प्ट्स-

आपल्या दोघांची एक सुंदर कार्टून शैलीतील इमेज बनवा, ज्यामध्ये आम्ही फ्रेंडशिप डे साजरा करतो आहोत.

माझ्या आणि माझ्या मित्राची एक हायपर रिअलिस्टिक इमेज बनवा, ज्यामध्ये आम्ही हसून एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभे आहोत. “फ्रेंडशिप डे” आणि “आनंद” या शब्दांचा वापर करून एक आकर्षक स्टिकर बनवा.

अशा प्रकारच्या सूचना व्हॉट्सॲप यायला देऊन तुम्ही तुम्हाला हवे तसे फ्रेंडशिप डे चे स्टिकर्स आणि फोटोज बनवून घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Vidhansabha Election : पुण्यात पुन्हा धंगेकर विरूद्ध रासने! विधानसभेला भाजपकडून जुन्याच चेहऱ्यांना संधी

IND vs NZ Test: ४३३१ दिवस, १२ वर्षे अन् १८ मालिका... अखेर टीम इंडिया मायदेशात हरले! एकदा आकडेवारी पाहाच

Murlidhar Mohol on Manoj Jarange : जरांगे पाटलांचा राग फडणवीसांवर नाही तर... मुरलीधर मोहोळ स्पष्टच बोलले

राज ठाकरेंसोबत माझी तुलना कधी होऊ शकत नाही कारण... अमित ठाकरेंनी व्यक्त केल्या वडिलांविषयी भावना

Vasai Assembly Election 2024 : वसईत महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ...

SCROLL FOR NEXT