How to Unlock Your Smartphone If You've Forgotten the Password  esakal
विज्ञान-तंत्र

Mobile Password Tips : मोबाईलचा पासवर्ड विसरला? चिंता कशाला; एका मिनिटांत होईल Recover,सोपी ट्रिक वापरुन बघाच

Saisimran Ghashi

Smartphone Safety Tips : आपल्या सर्वांच्याच स्मार्टफोनवर एखाद्या अनोळखी व्यक्तीला फोन वापरण्यापासून रोखण्यासाठी पासवर्ड असतो. पण कधी कधी आपण तोच पासवर्ड विसरून जातो. अशा परिस्थितीत Google Android वापरणाऱ्यांसाठी एक सोपा मार्ग उपलब्ध करतो. यासाठी फक्त तुमच्या स्मार्टफोनवर लॉग इन करण्यासाठी वापरलेले Google अकाउंट आणि इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे.

तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला असाल आणि तुमच्या फोनवर परत मिळवायचा असेल तर, तुमचे Google अकाउंट वापरून तो रीसेट करू शकता. तुमच्या स्मार्टफोनचा पासवर्ड रीसेट करण्यासाठी आम्ही काही सोप्या स्टेप्स सांगणार आहोत.

  • वेब ब्राउजर उघडा आणि अड्रेस बारमध्ये android.com/find टाईप करा आणि Enter दाबा.

  • तुमच्या Google अकाउंटने साइन इन करा.

  • तुम्ही रीसेट करू इच्छित असलेला स्मार्टफोन निवडा.

  • डाव्या बाजूच्या साइडबारमध्ये "Factory reset device" वर क्लिक करा.

  • तुमचा फोन फॅक्टरी रीसेटची प्रक्रिया सुरू करेल.

आपल्या दैनिक जीवनात स्मार्टफोन खूप महत्वाचे झाले आहेत. त्यामध्ये आपले फोटो, वैयक्तिक माहिती आणि आर्थिक डेटा असतो. फोन चोरी झाल्यास, त्यामुळे तुमची खासगी माहिती धोक्यात येऊ शकते आणि आर्थिक नुकसानही होऊ शकते. आजवर आपण Androidच्या गोपनीयता-केंद्रित वैशिष्ट्यांबद्दल बोललो. आता मात्र iPhone वर उपलब्ध असलेल्या Self-Destruct Feature बद्दलही जाणून घेऊया.

हे फीचर तुमचा iPhone चोरी झाल्यास तुमच्या डेटावर संरक्षण देण्यासाठी डिझाइन केलेला आहे. जर तुमचा iPhone चोरी झाला आणि कोणी चुकीचा पासवर्ड टाकण्याचा प्रयत्न करेल तर, iPhone वरील Self-Destruct Feature सक्रिय होईल. सहा चुकीच्या प्रयत्नांनंतर पुढचा प्रयत्न करण्यापूर्वी वेळ थांबेल. आणि जर 10 वेळा चुकीचा पासवर्ड टाकला गेला तर, iPhoneवरील सर्व डेटा डिलिट केला जाईल. हा एक अत्यंत उपयोगी सुरक्षा उपाय आहे आणि यामुळे तुमचे सर्व फोटो, अॅप्स, कॉन्टॅक्ट्स आणि इतर वैयक्तिक डेटा कायमस्वरूपी हटवले जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भाई, IPL मध्ये कोणत्या टीमकडून खेळणार?" चाहत्याच्या प्रश्नावर Rohit Sharma चे भन्नाट उत्तर, Video Viral

Diwali Festival 2024 : टिकाऊ, इको- फ्रेंडली आकाशकंदीलांना मागणी! बाजारपेठ सजली; किमतींमध्ये दहा टक्के वाढ

Vijaya Rahatkar: विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती; अर्चना मुजुमदार असतील नव्या सदस्य

Ajit Pawar: "लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, आम्ही केंद्रातून निधी आणू"; अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं

Bigg Boss 18 Eviction : नो गेम नो फेम, दुसऱ्याच आठवड्यात 'बिग बॉस १८'च्या घरातून बाहेर झाला 'हा' सदस्य

SCROLL FOR NEXT