मागील काही दिवसांपासून चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडीओ लीक झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. वसतिगृहातीलच एका विद्यार्थिनीने इतर विद्यार्थिनींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ बनवून ते व्हायरल केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्या मुलीने फक्त स्वतःचा व्हिडिओ शेअर केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी आता तीन सदस्यीय एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
प्रश्न असा आहे की जर एखादा व्हिडिओ लीक होऊन पॉर्न वेबसाइटवर अपलोड झाला असेल तर तो काढण्याचा असेल तर ते शक्य आहे का? तर होय, असे काही मार्ग आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही पॉर्न साइट किंवा सोशल मीडिया वेबसाइटवर अपलोड केलेला व्हिडिओ किंवा फोटो हटवू शकता. यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवणे हाच उत्तम पर्याय मानला जातो. मात्र, यासाठी बराच वेळ लागू शकतो.
वेबसाइट चालवणाऱ्यांकडे तक्रार करा
असा एखादा व्हिडीओ तुम्हाला काढून टाकायचा असेल तर तुम्ही वेबसाइटच्या ओनरशी संपर्क साधून व्हिडिओ हटवण्यास सांगू शकता. बहुतेक वेबसाइट कॉपीराइट धोरणाचे पालन करतात. यामुळे ती अशा पोस्ट लगेच काढून टाकते. तुम्ही वेबसाइटच्या मालकाशी संपर्क साधू शकत नसल्यास काय करावे? अशा परिस्थीतीमध्ये तुम्हाला दुसरी पद्धत अवलंबावी लागेल.
वेबसाईट चालकाचा कॉन्टॅक्ट कसा मिळवाल?
तुम्हाला थर्ड पार्टीची यासाठी मदत घ्यावी लागेल. सर्वप्रथम यासाठी तुम्हाला www.whois.com या वेबसाइटची मदत मिळू शकते. यामध्ये कोणत्याही वेबसाईटचे डोमेन नेम टाकल्यास त्याच्याशी संबंधित संपूर्ण तपशील उपलब्ध होतो. येथून आपण साइट मालकाशी संपर्क साधू शकता आणि त्याच्याकडून व्हिडिओ काढला जाऊ शकतो. पॉर्न साइट्सवरून व्हिडिओ काढून टाकणे त्या तुलनेत जास्त सोपे आहे. यासाठी व्हिडिओच्या तळाशी तक्रार करण्याचा पर्याय देण्यात आलेला असतो. याद्वारे तुम्ही व्हिडिओ डिलीट करण्याचे कारण देऊन तुमचे काम करून घेऊ शकता.
गुगल सर्चमधून कसं हटवणार?
गुगल सर्च रिझल्टमधून कोणताही आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडिओ काढून टाकणे सोपे आहे. तुम्ही यासाठी थेट Google शी संपर्क करू शकता. यासाठी तुम्हाला https://support.google.com/websearch/troubleshooter/3111061#ts=2889054%2C2889099%2C288910 या साइटवर जावे लागेल. याद्वारे सायबर गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये महिलांना अधिक मदत केली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.