Step-by-Step Guide to Scheduling WhatsApp Messages esakal
विज्ञान-तंत्र

Whatsapp Message Scheduling : व्हॉट्सॲपमध्ये मेसेज शेड्युल कसे करायचे? जाणून घ्या एका क्लिकवर

Whatsapp Message Schedule Feature: व्हॉट्सॲपमध्ये अगोदरच वेळ निश्चित करून मेसेज पाठवता येणार आहे म्हणजेच मेसेज शेड्यूल करता येणार आहेत.

Saisimran Ghashi

Whatsapp Message New Feature : आपल्या सर्वांच्या आवडीच्या व्हॉट्सॲपमध्ये आता एक धमाकेदार फीचर आलंय.आता तुम्ही तुमच्या महत्वाच्या मेसेजेस आधीच वेळ निश्चित करून पाठवू शकता. म्हणजे, वाढदिवसाच्या शुभेच्छा, बिझनेस डीलची आठवण करून देणारा मेसेज किंवा एखाद्या कार्यक्रमाची माहिती हे सगळं आता अगोदरच वेळ निश्चित करून पाठवता येणार आहे म्हणजेच मेसेज शेड्यूल करता येणार आहेत.

या फीचरमुळे काय फायदा होतो?

आधीच वेळापत्रक बनवल्यामुळे तुम्हाला दरवेळी मेसेज पाठवायचा विसर पडत नाही.

तुमच्या कस्टमर्सना किंवा मित्रांना जेव्हा ते सर्वात जास्त सक्रिय असतात तेव्हा मेसेज मिळतात. त्यामुळे मेसेज वाचण्याची आणि प्रतिसाद देण्याची शक्यता वाढते.

वेळापत्रक (message scheduling) बनवून तुम्ही तुमच्या नवीन उत्पादनांची माहिती, ऑफर्स किंवा कार्यक्रमांची माहिती थेट तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकता.

अँड्रॉइड, आयओएस, वेब आणि बिझनेस अकाउंटवर मेसेज पाठवण्याच वेळापत्रक ((message scheduling)) कसं बनवायचं ते जाणून घ्या.

Android वापरकर्ते

सेटिंग्जमध्ये जाऊन Accessibility Services मध्ये Whatsapp सेवा सुरू करा.

Whatsapp लाँच करा आणि "+" चिन्ह निवडा.

ज्या व्यक्तीला किंवा ग्रुपला मेसेज पाठवायचा आहे ते निवडा.

वेळ आणि तारीख निश्चित करा.

मेसेज टाइप करा आणि "Create" वर क्लिक करा.

iPhone वापरकर्ते

ॲप स्टोअरवरून Shortcuts ॲप डाउनलोड करा.

या ॲपमध्ये पर्सनल ऑटोमेशन बनवा आणि वेळ तारीख निश्चित करा.

"Text" अॅक्शन ॲड करा आणि मेसेज टाइप करा.

"Send Message Through WhatsApp" अॅक्शन वापरून व्हॉट्सॲपला जोडा.

ज्या व्यक्तीला मेसेज पाठवायचा आहे ते निवडा आणि मेसेज शेड्यूल करा.

WhatsApp Web वापरकर्ते

  • क्रोम वेब स्टोअरवरून Blueticks एक्सटेन्शन डाउनलोड करा.

  • WhatsApp Web लाँच करा आणि ज्या व्यक्तीला मेसेज पाठवायचा आहे त्या चॅटवर जा.

  • मेसेजबॉक्सच्या शेजारील असलेल्या शेड्यूलिंग चिन्हावर क्लिक करा.

  • मेसेज टाइप करा आणि वेळ तारीख निश्चित करून "Schedule Send" वर क्लिक करा.

  • WhatsApp Business अकाउंट वापरकर्ते

  • तुमच्या डिव्हाइसवर WhatsApp Business अॅप लाँच करा.

  • सेटिंग्जमध्ये जा आणि Business Tools निवडा.

  • "Select Away Message" निवडा आणि "Send away message" सुरू करा.

  • मेसेज टाइप करा आणि "Only Send to in the Recipients" निवडा.

  • तुमच्या कंपनीच्या वर्किंग आउअर्सनुसार शेड्यूल करा.

आता वेळापत्रक बनवून तुमच्या WhatsApp संवादात सुधारणा करा आणि तुमच्या व्यवसायाला नवीन गती द्या!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT