Instagram AI Feature : गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲपल आणि मेटा या सर्व बड्या कंपन्या आपापल्या प्लॅटफॉर्म्समध्ये नवनवीन बदल घडवून आणण्यासाठी AIचा वापर करत आहेत. याच स्पर्धेत उतरून मार्क झुकरबर्गच्या मेटाने फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपमध्ये AI फीचर्स आणले. त्यामुळे वापरकर्त्यांचा सोशल मीडिया वापराचा अनुभव आणखी चांगला झाला. अगदी काही क्लिकमध्ये इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये फोटोची पाश्र्वभूमी बदलण्याची सुविधा म्हणजे याच नाविन्यतेचा एक भाग आहे.
या फीचरच्या मदतीने तुम्ही फक्त काही क्लिक्समध्ये तुमच्या फोटोची पार्श्वभूमी म्हणजेच बॅकग्राऊंड बदलू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर वापरकर्त्यांचा अनुभव आणखी सुखद करण्यासाठी मेटा कंपनी AI फीचर्सवर भरपूर लक्ष देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कंपनीने नुकतेच हे मजेदार नवीन फीचर आणले आहे. यात तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये फोटोचे बॅकग्राऊंड अगदी तुमच्या मनाप्रमाणे बदलू शकता.
DALL-E किंवा Midjourney यासारख्या प्रसिद्ध AI प्लॅटफॉर्मप्रमाणेच या फीचरमध्ये तुम्हाला तुमच्या फोटोसाठी पार्श्वभूमी निवडण्यासाठी काही शब्द द्यायचे आहेत. ही सुविधा सध्या फक्त निवडक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे, पण येत्या काही आठवड्यांत सर्वजणांसाठी खुली होईल.
१. सर्वप्रथम तुमचा फोटो घ्या किंवा तुमच्या कॅमेरा रोलमधून निवडा.
२. नंतर, स्क्रीनच्या वरच्या भागात असणाऱ्या आयकॉनमध्ये (टेक्स्ट आणि म्युझिकच्या बाजूला) तुम्हाला एक आयकॉन दिसेल. या आयकॉनमध्ये एखादी व्यक्ती आणि त्यांच्या मागे आयताकार चौकट दाखवली असेल. हाच तो AI बॅकग्राऊंड बदलण्याचा आयकॉन आहे.
३. हा आयकॉन दाबा आणि पुढील स्टेपचे पालन करा.
४. तुमचा फोटो निवडल्यानंतर, इंस्टाग्राम तुमच्या फोटोमधील विविध गोष्टींचे विश्लेषण करेल (उदा: बॅकग्राऊंड आणि लोक). थोडा वेळ थांबा.
५. यानंतर तुम्हाला तुमच्या फोटोमधला कोणता भाग पार्श्वभूमीत ठेवायचा आहे ते निवडता येईल. ते निवडल्यानंतर "पुढे" (Next) दाबा.
६. आता तुम्हाला "तुम्हाला कोणती पार्श्वभूमी हवी?" असे विचारले जाईल. उदाहरणार्थ, तुम्ही "समुद्राच्या किनाऱ्याला बसलेले" किंवा "डोंगरावर बसलेले" असे लिहू शकता.
७. तुमची माहिती भरल्यानंतर "पुढे" (Next) दाबा.
८. तुमच्या माहितीनुसार AI तुम्हाला दोन बॅकग्राऊंड पर्याय देईल. ते आवडले नाहीत तर पुन्हा नवीन पर्याय मिळवण्यासाठी "रिफ्रेश" (Refresh) बटण दाबा.
९. तुम्हाला आवडलेला पर्याय निवडून पुढे जा आणि स्टोरी शेअर करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.