Google Photos Magic Editor AI Tool  esakal
विज्ञान-तंत्र

Google Photos Magic Editor : प्रोफेशनल फोटो एडिटिंग करायचंय? मग चिंता कशाला, वापरा गुगलचं 'हे' टूल

Saisimran Ghashi

Google AI Editing Tools : आपल्या आवडत्या फोटोज् अगदी सोप्या पद्धतीने प्रो-लेव्हलचं बनवायचं आहे का? तर आता ते शक्य आहे. Google Photos मध्ये नवीन 'मॅजिक एडिटर' फीचर आलं आहे. हे AI-वर आधारित टूल फोटो एडिटिंगचे जग बदलून टाकणार आहे.

आपल्या आवडत्या फोटोमध्ये कठीण एडिटिंग करणे आता सोपे झाले आहे. Google Photos मध्ये नवीन 'मॅजिक एडिटर' हे AI-वर आधारित साधन आहे. यामुळे आता कोणत्याही व्यावसायिक कौशल्याशिवाय फोटोमध्ये तुमच्या इच्छेप्रमाणे हवे तस एडिटिंग करणे शक्य आहे.

काय आहे मॅजिक एडिटर?

आतापर्यंत Google Photos मध्ये काही मूलभूत एडिटिंग टूल्स उपलब्ध होते. पण मॅजिक एडिटर वेगळं आहे. ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर करून अगदी जटिल फोटो एडिटिंग शक्य करतं. आता तुम्ही फोटोमधला आकाशी बदलू शकता, एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या ठिकाणी हलवू शकता, नको असलेले भाग काढून टाकू शकता आणि बरेच काही!

हे एडिटिंग करण अगदी सोपं आहे. Google Photos मध्ये एखादा फोटो एडिट करण्यासाठी निवडा आणि मग 'एडिट' पर्याय दाबा. डाव्या कोपऱ्यात तुम्हाला 'मॅजिक एडिटर' बटण दिसेल. ते दाबा आणि तुमच्या फोटोवर मॅजिक सुरु होईल. तुम्ही बॅकग्राऊंड बदलू शकता, फोटोला वेगवेगळा कलर फीचर देऊ शकता किंवा एखाद्या वेगळ्या स्टाइलमध्ये फोटो एडिट करू शकता.

फक्त एवढंच नाही तर तुम्ही फोटोमधून एखादी व्यक्ती किंवा वस्तू दुसऱ्या ठिकाणी हलवू शकता, त्यांचं आकार बदलू शकता किंवा पूर्णपणे काढून टाकू शकता. AI टूल एडिटिंगची जादू करेल आणि काढलेल्या वस्तूंच्या जागी तुम्ही दिलेल्या सूचनांप्रमाणे नवीन वस्तु जोडेल.

मॅजिक एडिटर कसा वापरायचा?

  1. तुमच्या आवडत्या फोटोवर Google Photos मध्ये एडिट करा हा पर्याय निवडा.

  2. डाव्या कोपऱ्यात "मॅजिक एडिटर" बटण दिसून येईल. ते दाबा.

  3. मॅजिक एडिटर वापरण्यासाठी "Try Now" वर टॅप करा.

  4. इथे आपल्याला अनेक पर्याय दिसतील, ज्याद्वारे आपण फोटोमध्ये इच्छेप्रमाणे बदल करू शकता.

मॅजिक एडिटर अजून सुरुवातीच्या चाचणीच्या टप्प्यात आहे पण ते फोटो एडिटिंगला पूर्णपणे बदलून टाकणार आहे. तुम्हीही तुमच्या फोटोवर ही एआयची जादू करून पाहू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: विदर्भ बदलतो संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण, ढासळलेला बालेकिल्ला नरेंद्र मोदी मजबूत करणार? वर्धा दौरा का आहे स्पेशल?

Crime: तक्रार केलीस तर... धमकी देत १३ वर्षीय मुलावर अत्याचार, ५० वर्षीय नराधमाचं कृत्य, मुलुंडमध्ये खळबळ

Latest Marathi News Updates : शरद पवार यांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली

Shama Sikander : बालवीर फेम शमा सिकंदरने केला होता आयुष्य संपवण्याचा प्रयत्न ; खुलासा करत म्हणाली "हॉस्पिटलमध्ये मला दाखल..."

Share Market At Record High: शेअर बाजाराने केला नवा विक्रम, सेन्सेक्स पहिल्यांदाच 84 हजारांवर पोहोचला

SCROLL FOR NEXT