AI in Telegram : हल्ली सगळीकडे AI ट्रेंड सुरु झालाय.वेगवेगळ्या कंपन्यांनी त्यांच्या ऍप्स साठी AI चे फिचर उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये टेलिग्राम देखील मागे राहिलेले नाही. आता तुम्ही तुमच्या आवडत्या टेलीग्राम अॅपवरुन मायक्रोसॉफ्टचा कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) असिस्टंट चॅटबॉट कोपायलटशी संवाद साधू शकणार आहात.
Copilot आता परीक्षणाच्या टप्प्यात असून, तो वापरण्यासाठी पूर्णपणे मोफत आहे. या चॅटबॉटच्या मदतीने तुम्ही विविध विषयांवर माहिती मिळवू शकता, जसे की प्रवासाविषयी टिप्स, क्रीडा क्षेत्रातील अपडेट्स, सिनेमांच्याबद्दलच्या शिफारशी आणि बरेच काही फिचर तुम्ही वापरू शकणार आहे.
Copilot वापरण्यासाठी अगदी सोपे आहे.
फक्त टेलीग्राम अॅप उघडा आणि सर्च बारमध्ये "@CopilotOfficialBot" असे टाईप करा.
पर्याय म्हणून तुम्ही हा लिंक [link to Copilot for Telegram ON Microsoft microsoft.com] देखील वापरू शकता.
त्यानंतर "Start" बटण दाबा आणि नियम व अटी स्वीकारा. शेवटी तुमचा फोन नंबर सबमिट केल्यानंतर तुम्ही कोपिलॉटशी संवाद सुरू करू शकता.
विविध विषयांवर माहिती मिळवू शकता. तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकता. तुमच्या सर्जनशील लेखनात मदत मिळवू शकता. प्रवासाची आणि मनोरंजनाची योजना बनवू शकता.
Copilot सध्या परीक्षणाच्या टप्प्यात आहे. त्यामध्ये एका दिवसात 30 प्रश्नांची मर्यादा आहे. टेलीग्रामवर आलेला Copilot तुमच्या चॅटिंगचा, माहिती मिळवण्याचा अनुभव अधिक मनोरंजक बनवण्यासाठी सज्ज आहे. आजच कोपिलॉट वापरून पाहा आणि AI च्या मदतीने ऍडव्हान्स कम्युनिकेशन करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.