WhatsApp chatting esakal
विज्ञान-तंत्र

Whatsapp Message : व्हाट्सॲपवर Safe अन् Private मेसेज कसे करायचे?

या संदर्भात व्हाट्सॲपने गाइडलाईन जारी केल्या आहेत.

निकिता जंगले

Whatsapp Message : सेफर इंटरनेट डे जवळ आलाय. या दिवसाची यंदाची थीम आहे ऑनलाइन जगात कम्युनिकेशनसाठी स्पेस तयार करणे. याच पार्श्वभूमीवर WhatsApp डिजिटल सुरक्षिततेला घेऊन काही महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. सुरक्षितरित्या कसा व्हाट्सॲपचा वापर करता येईल याविषयी जागरूकता वाढवण्याच्या प्रयत्न करत आहे.

या संदर्भात व्हाट्सॲपने गाइडलाईन जारी केल्या आहेत. चला तर या विषयी सविस्तर जाणून घेऊयात. (how to use Whatsapp Message safe and private read guidelines )

पर्सनल माहिती खाजगी ठेवा:

आपण दररोज ऑनलाइन वावरतो, व्यव्हार करतो. त्यामुळे इंटरनेटचा वापर करताना आपली वैयक्तिक माहिती खाजगी ठेवणे तितकेच आवश्यक आहे. तुमचा पत्ता,फोन क्रमांक,पासवर्ड्स, क्रेडिट/डेबिट कार्ड क्रमांक आणि बँक खात्याची माहिती शेअर करणे टाळा.

व्हाट्सॲप युजर्सनी त्यांची प्रोफाइल फोटो, लास् ट सीन, ऑनलाइन स्टेटस, अबाऊट स्टेटस खाजगी ठेवावे.

तुमच्या अकाउंटच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रायवसी ॲड करा

व्हाट्सॲप युजर्स यांनी टू-स्टेप व्हेरिफिकेशन हे फिचर्सचा वापर करावा. यामुळे तुमचे व्हाट्सॲप अकाऊंट रिसेट करताना सहा- अंकी पिनची आवश्यकता असते. ही सुविधा सिम कार्ड चोरीला गेल्यास किंवा फोन हरवलास तेव्हा कामी येतं

फॉरवर्ड करण्याची चेन ब्रेक करा:

व्हॉट्सअपने सर्व फॉरवर्डेड मॅसेजेस् (forwarded messages ) साठी लेबल तयार केले आहे आणि युजर्सनी या मेसेजेला शेअर करण्यापूर्वी विचार करावे.

नुकतेच व्हाट्सॲपने नवीन ग्रुप फॉरवर्डिंग लिमिट्स सांगितल्या आहेत, जेथे 'फॉरवर्डेड लेबल'असलेले फॉरवर्डेड मेसेज फक्त पाच वेळा ऐवजी फक्त एका वेळी एकाच ग्रुपला पाठवता येऊ शकते. म्हणून तुम्हाला मेसेजचा स्रोत माहित नसेल तर मेसेज फॉरवर्ड करू नका.

स्कॅम ओळखा आणि त्याबाबत रिपोर्ट करा:

इंटरनेटवर स्पॅम मेसेज, सायबर थ्रीट आणि फसवणूक दिवसेंदिवस वाढली आहे. मग ती नोकरीची ऑफर असो,रोख पारितोषिक जिंकणे किंवा पूर्ण प्रायोजित सहली या संदेशांमध्ये बर्याचदा वेबसाइटच्या लिंक्सचाही समावेश असतो किंवा कधी कधी वैयक्तीक माहितीही दिली जाते.

व्हाट्सॲपवर जर तुम्हाला असा काही मेसेज आला तर block and report the account करणे कधीही चांगले.

फेक न्युज फॅक्टचेक करा :

भारतात व्हॉट्सअपवर १० स्वतंत्र फॅक्ट चेक संस्था आहेत, ज्या युजर्संना माहिती ओळखण्यास, रिव्ह्यू देण्यास, खरी आहे की खोटी हे तपासण्यास आणि चुकीची माहिती न पसरण्यास मदत करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT