Google TV App Mobile Remote esakal
विज्ञान-तंत्र

TV Remote Tips : अँन्ड्रॉईड असो वा आयफोन, तुमच्या मोबाईलला बनवा टीव्हीचा स्मार्ट रिमोट! फॉलो करा 'या' ट्रिक्स

Mobile Remote : कधीकधी टीव्हीचा रिमोट घरात गायब होतो सोफ्याखाली, बेडखाली जातो तर कधीकधी तो अचानक बंद पडतो.रिमोट नसल्यामुळे टीव्ही चालवणे कठीण होऊन जाते.

Saisimran Ghashi

Tech Tips : कधीकधी टीव्हीचा रिमोट घरात गायब होतो सोफ्याखाली, बेडखाली जातो तर कधीकधी तो अचानक बंद पडतो.रिमोट नसल्यामुळे टीव्ही चालवणे कठीण होऊन जाते. पण, आता ही समस्या कायमची सोडवण्याची वेळ आली आहे. अश्यात तुमच्या स्मार्टफोनला तुम्ही तुमच्या टीव्हीचा रिमोट बनवू शकता.

गुगल टीव्ही अॅपच्या मदतीने तुम्ही तुमचे Android टीव्ही थेट तुमच्या स्मार्टफोनद्वारे चालवू शकता. म्हणजे चॅनेल बदलणे, आवाज कमी-जास्त करणे, आवडत्या अॅप्स चालू करणे हे सगळे करता येते. आता तुम्हाला घरभर रिमोट शोधत फिरण्याची गरज न पडता हे करता येईल. याचा फायदा अँड्रॉइड आणि आयफोन दोन्ही वापरणार्‍यांना होऊ शकतो.

तुमच्या Android फोनवर किंवा iPhone वर Google TV अॅप इंस्टॉल करून आणि ते तुमच्या टीव्हीशी कनेक्ट करून ते रिमोट म्हणून वापरण्यासाठी काही सोप्या पद्धती खाली दिल्या आहेत.

Android टीव्ही रिमोट

गूगल प्ले स्टोअरमधून Google TV अॅप डाउनलोड करा.

तुमचा टीव्ही आणि फोन एकाच वायफायवरवर असल्याची खात्री करा. जर तुमच्या टीव्हीमध्ये वायफाय नसेल तर ब्लूटूथच्या सहाय्यानेही फोन आणि टीव्ही कनेक्ट करता येतात.

Google TV अॅप उघडा. त्यानंतर खालच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या रिमोट (Remote) बटण दाबा.

अॅप तुमच्या आसपासच्या डिव्‍हाइसेस शोधण्यास सुरुवात करेल. तुमच्या टीव्हीचे नाव दिसल्यावर त्याची निवड करा.

तुमच्या टीव्ही स्क्रीनवर एक कोड दिसेल. तो कोड अॅपमध्ये टाका आणि पेअर (Pair) बटण दाबा.

एकदा तुमचा फोन टीव्हीशी कनेक्ट झाल्यावर, तुम्ही तो रिमोटसारखा वापरू शकता.

iPhone टीव्ही रिमोट

तुमचे iPhone आणि टीव्ही एकाच वायफायवरवर असल्याची खात्री करा.

App स्टोअरमधून Google TV अॅप डाउनलोड करा.

तुमचे iPhone वर Google TV अॅप उघडा.

स्क्रीनच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या टीव्ही रिमोट (TV Remote) आकाराचे बटण दाबा.

अॅप आपोआप तुमचा टीव्ही शोधण्यास सुरुवात करेल. जर टीव्ही सापडला नाही तर 'Scan for devices' बटण दाबा.

एकदा टीव्ही दिसला की त्याची निवड करा आणि तुमच्या टीव्ही स्क्रीनवर दिसणारा 6-अंकी कोड अॅपमध्ये टाका.

तुमचे iPhone टीव्हीशी कनेक्ट करण्यासाठी पेअर (Pair) बटण दाबा.

एकदा तुमचा iPhone तुमच्या टीव्हीशी कनेक्ट झाल्यावर, तुम्ही तो रिमोटसारखे वापरू शकता. चॅनेल बदलणे, आवाज कमी-जास्त करणे, व्हिडिओ प्लेबॅक आणि इतर गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Assembly Election 2024 Result: मालेगाव मध्यने थंडीत फोडला घाम; जिल्ह्यातील 14 मतदारसंघांचे निकाल निर्धारित वेळेत

IND vs AUS 1st Test : OUCH! विराट कोहलीने खणखणीत Six मारला, चेंडू निवांत बसलेल्या कर्मचाऱ्याच्या डोक्यावर आदळला, Video

Manoj Jarange News: आम्ही मैदानात उतरलो नाही, तरीही फेल झाले म्हणता... मनोज जरांगेंचा सवाल

दिग्दर्शक आदित्य धारबरोबर रणवीरने सुवर्णमंदिरात घेतलं दर्शन ; 'या' बिग बजेट प्रोजेक्टच्या शूटिंगला होणार सुरुवात

Sunil Shelke Won Maval: तो एक फोटो अन्... भाजप विरोधात तरी सुनील शेळके कसे निवडून आले? अजित पवारांनी सांगितला किस्सा

SCROLL FOR NEXT