‘एचपी’ने नवीन लॅपटॉप ‘ओमेन ट्रान्ससेंड १४’ लाँच केला आहे. esakal
विज्ञान-तंत्र

HP Laptop Launch : ‘एचपी’कडून ऑल इन वन सोल्यूशन ; गेमर्ससाठी दमदार लॅपटॉप

सकाळ डिजिटल टीम

OMEN Transcend 14 : जर तुम्हाला गेमिंगची आवड असेल, तर ‘एचपी’ने आपला नवीन लॅपटॉप ‘ओमेन ट्रान्ससेंड १४’ हा तुमच्यासाठी नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. गेमिंगसाठी हा लॅपटॉप किती परिपूर्ण आहे आणि किती नाही, याची चाचणी घेण्यासाठी आम्ही हा लॅपटॉप आठवडाभर वापरला, तर चला मग जाणून घेऊया या लॅपटॉपचे फायदे आणि तोटे.

आकर्षक डिस्प्ले

डिस्प्लेबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये २.८K रिझोल्यूशन सपोर्टसह १२० Hz रिफ्रेश रेटसह OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने व्हिज्युअल क्वॉलिटीला प्राधान्य दिल्याचे यावरून दिसून येते. त्यामुळे व्हिडीओ हे स्पष्ट दिसण्यासोबत रंगसंगती ही उत्तम उठून दिसते. यामध्ये शानदार व्हिज्युअल्स मिळतात. गेंमिगवेळी हा लॅपटॉप अगदी स्मूद चालतो.

या प्राईज रेंजमध्ये रिफ्रेश रेट १२० Hz ऐवजी १४४ Hz देणे अपेक्षित होते. त्यातच डिस्प्लेचा आकार १४ इंच देण्यात आला आहे. त्यामुळे कंपनीला गेमिंग लॅपटॉप म्हणजे डिस्प्लेचा आकार मोठा देता आला असता. या १४ डिस्प्ले साईजमुळे एचपीला बाजारातील अन्य लॅपटॉपशी मोठी स्पर्धा करावी लागेल. गेमिंग लॅपटॉप बाजारात सहज उपलब्ध आहेत.

युनिक कीबोर्ड

एचपी ओमेन ट्रान्ससेंड १४मध्ये एक युनिक कीबोर्ड मिळतो. कीज या बोल्ड आणि मोठ्या असल्या तरी त्या फारच जवळजवळ आहेत. ड्युअल टोन कीजच्या टॉपला व्हाईट पेंट आणि अर्धपारदर्शक बॉर्डर आहे. यामध्ये RGB लाइटिंग कस्टमाइज करता येते. या कीजमध्ये थोडे अंतर जास्त असते तर गेमिंग आणि टायपिंग करणे अधिक सुलभ झाले असते.

एचपी ओमेन ट्रान्ससेंड १४मध्ये मागील बाजूस टाइप सी पोर्ट आहे. दिसायलाही लॅपटॉप प्रीमियम फील देतो. समोर शगुन लिहिलेले असते. ग्लॉसी पॅनलला पातळ बेझल्स देण्यात आले आहेत. एकंदरीत, हातात धरले की काहीतरी महागडी वस्तू धरल्यासारखे वाटते.

दमदार कामगिरी

एचपीच्या या लॅपटॉपच्या कामगिरीबाबत कोणतीही अडचण येणार नाही. यामध्ये Intel Core UItra ७ १५५H प्रोसेसर देण्यात आला आहे. ज्याचा क्लॉक स्पीड ३.२GHz आहे. तर GPU साठी RTX ४०६० GPU चा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर १६GB VRAM मिळतो. रोजच्या वापरासाठी हा लॅपटॉप एक चांगला पर्याय आहे.

यावर मल्टीटास्किंग अगदी सोप्या पद्धतीने करता येते. त्यातच कंपनीने एचपी ओमेन ट्रान्ससेंड १४ हा गेमिंग आणि हेवी ग्राफिक्स संबंधित काम हाताळण्यासाठी डिझाइन केले आहे. यामध्ये अगदी २० टॅब जरी उघडे ठेवले तरी लॅपटॉप ‘मख्खन की तरा’ काम करतो.

यामध्ये तुम्ही फोटोशॉप, प्रीमियर प्रोसारखे सॉफ्टवेअर सहजपणे चालवू शकाल. त्याच हेवी एडिटिंग करतानाही कोणतीही अडचण येत नाही. मात्र, जर तुम्ही प्रो गेमर असाल तर तुम्हाला हा लॅपटॉप गरम होण्याच्या समस्या दिसू शकतात.

वेगळं काय?

रोजच्या वापरण्यासाठी हा लॅपटॉप नक्कीच फायदेशीर आहे. यूट्युब, व्हॉट्सअ‍ॅप आणि जीमेलसह २० ते ३० टॅबदेखील सहज हाताळता येतात. प्रामुख्याने लॅपटॉप मल्टीटास्किंग करताना अडचणी येतात, मात्र ओमेन ट्रान्ससेंडमध्ये मल्टीटास्किंग सहज करता येते.

विशेष म्हणजे, कोणतीही टॅब रिफ्रेश करावी लागत नाही. आपण जिथे काम सोडलेले असते ते तसेच मिळते. यावर जेवढे व्हिडीओज पाहिले त्यांचे व्हिज्युअल्स चांगले मिळाले. याचे स्पिकर्स जास्त लाऊड नाहीत; पण स्पष्ट ऐकू येतात. कॉम्पॅक्ट साइज आणि पोर्टेबल साईजमुळे हाताळण्यास सोपा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'या' शिल्पकाराने घडवलाय राहुल गांधींनी अनावरण केलेला कोल्हापुरातील शिवरायांचा पुतळा; जाणून घ्या रायगड कनेक्शन

ती कुठेय? सगळे आले पण ती नाही दिसली, बिग बॉस मराठीचा प्रोमो पाहून नेटकरी करतायत तिची चौकशी

Bigg Boss Marathi 5 : सूरज की निक्की कोण आहे व्होटिंग ट्रेंड्समध्ये आघाडीवर ? घ्या जाणून या सीजनचे फायनल वोटिंग ट्रेंड्स

Used Car Buying Tips: सणासुदीत रिसेल कार खरेदी करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, होणार नाही फसवणूक

Latest Marathi News Live Updates : वीज दरवाढीचा व्यावसायिकांना ‘शॉक’; प्रतियुनिट 2 रुपये कमी करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT