iPhone 13 Sakal
विज्ञान-तंत्र

iPhone Offer: आतापर्यंतची सर्वात बंपर ऑफर! खूपच स्वस्तात मिळतेय iPhone चे लेटेस्ट मॉडेल; जाणून घ्या डिटेल्स

सकाळ डिजिटल टीम

Apple iPhone 13 Offer: अनेकजण आयफोनचे नवीन मॉडेल लाँच झाल्यावर जुने मॉडेल खरेदी करत असतात. याचे प्रमुख कारण म्हणजे नवीन मॉडेलनंतर जुन्या मॉडेलची किंमत कमी होते. काही दिवसांपूर्वीच आयफोन १४ ची बाजारात लाँच झाला आहे. यानंतर आता iPhone 13 च्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. iPhone 13 ची मूळ किंमत ६९,९०० रुपये आहे. परंतु, किंमत कपातीनंतर तुम्ही फक्त ६४,९९९ रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय, ऑफर्सचा फायदा मिळाल्यास फोनची किंमत २४ हजार रुपयांपर्यंत कमी होईल.

हेही वाचा: Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!

फ्लिपकार्टवर स्वस्तात मिळतोय iPhone 13

फ्लिपकार्टवर iPhone 13 ला ६४,९९९ रुपयात लिस्ट करण्यात आले आहे. फोन खरेदी करताना फेडरल बँकेच्या कार्डचा वापर केल्यास १५०० रुपये डिस्काउंट मिळेल. याशिवाय, २२,५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा देखील तुम्हाला फायदा मिळेल. iPhone 11 आणि iPhone 12 ला एक्सचेंज केल्यास तुम्हाला या ऑफरचा फायदा मिळेल. सर्व ऑफर्सचा फायदा मिळाल्यास फोनला फक्त ४० हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता.

iPhone 13 चे स्पेसिफिकेशन्स

या आयफोन मॉडेलमध्ये २५३२x११७० पिक्सल रिझॉल्यूशनसह येणारा ६.१ इंच सुपर रेटिना एक्सडीआर ओलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन A15 Bionic 5nm Hexa-कोर प्रोसेसरसह येतो. आयफोन १३ चे हे मॉडेल तीन स्टोरेज व्हेरिएंट्ससह येते.

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर फोनमध्ये रियरला १२ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. तसेच, पॉवर बॅकअपसाठी २० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ३२४० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोन iOS १५ वर काम करतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: खुशखबर! 'लाडकी बहीण'चा तिसरा हप्ता जमा होण्यास झाली सुरूवात; पैसे आले की नाही 'असे' करा चेक

Tata Factory Fire: टाटा समूहाच्या आयफोन प्लांटला भीषण आग; 100हून अधिक पोलिस तैनात, पाहा- VIDEO

IND vs BAN, 2nd Test: दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द! पावसाने खेळाडूंना मैदानात उतरूच दिलं नाही

Dharmveer Movie: ‘धर्मवीर ३’चे स्क्रीप्ट मी लिहिणार ! फडणवीस यांनी का केला मोठा दावा?

Latest Maharashtra News Live Updates : हिजबुल्लाह नेता हसन नसराल्लाह ठार? IDF ची सोशल मीडियावर पोस्ट

SCROLL FOR NEXT