Hyundai Exter SUV esakal
विज्ञान-तंत्र

Hyundai Exter SUV होणार लाँच, फीचर्सपासून ते लूक पर्यंत जाणून घ्या सर्वकाही

Exeter कंपनीच्या लोकप्रिय हॅचबॅक Grand i10 Nios प्रमाणेच प्लॅटफॉर्म आणि इंजिन ऑप्शन

सकाळ डिजिटल टीम

Hyundai Exter SUV : देशातील सुप्रसिद्ध कार निर्माता कंपनी Hyundai India आपली पहिली मायक्रो SUV Exter देशांतर्गत बाजारात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. नुकतीच, एक्स्टरची पहिली स्केच इमेज पाहण्यात आली आहे. ही कार भारतासह काही निवडक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये लॉन्च केली जाईल.

Exeter कंपनीच्या लोकप्रिय हॅचबॅक Grand i10 Nios प्रमाणेच प्लॅटफॉर्म आणि इंजिन ऑप्शन शेअर करेल. Hyundai Xtor SUV अधिकृत लॉन्च होण्यापूर्वी त्याचे संभाव्य स्वरूप आणि वैशिष्ट्यांसह सर्व तपशील तुम्ही आमच्या वेबसाईटवर पाहू शकता.

Hyundai Exter लाँचची तारीख

Hyundai Exter ची नेमकी लॉन्च तारीख अद्याप समोर आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही मायक्रो एसयूव्ही जुलै 2023 मध्ये भारतीय बाजारात दाखल होऊ शकते. या छोट्या एसयूव्हीची किंमत सणासुदीच्या आधी ऑगस्टमध्ये समोर येऊ शकते.

Hyundai Exter अपेक्षित किंमत

किंमतीबद्दल बोलायचे तर, Hyundai Exter ची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत सुमारे 6 लाख ते 10 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. Exter ही कार Grand i10 Nios, निसान मॅग्नाइट आणि रेनॉल्ट किगर व्यतिरिक्त थेट टाटा पंच आणि मारुती सुझुकी फ्रॉन्क्सशी स्पर्धा करेल.

Hyundai Exter Engine Power

Exter Micro SUV चे एंट्री-लेव्हल वेरिएंट 1.2-लिटर 4-सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनचे असेल. हे इंजिन Grand i10 Nios, Venue आणि Aura प्रमाणेच असेल. हे इंजिन 83bhp पॉवर आणि 114Nm टॉर्क जनरेट करेल. ट्रान्समिशनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटीचा पर्याय मिळेल. तसेच फॅक्टरी फिटेड सीएनजीचा पर्याय मिळण्याची शक्यता आहे.

या कारमध्ये 1.0L T-GDi टर्बो पेट्रोल इंजिन देखील दिले जाऊ शकते जे 120PS पॉवर आणि 175Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन आधी Grand i10 Nios Turbo मध्ये देण्यात आले होते, जेथे ते 100bhp पॉवर आणि 172Nm टॉर्क जनरेट करते. हे लोअर-स्पेक मॉडेल एक्स्टरसह ऑफर केले जाऊ शकते. ही पॉवरट्रेन मॅन्युअल आणि ड्युअल-क्लच ट्रान्समिशनसह दिली जाऊ शकते. Hyundai Exter चं इलेक्ट्रिक व्हर्जन देखील आणू शकते.

Hyundai Exter Design

Hyundai ने Exter चा अधिकृत टीझर जारी केला आहे, ज्यामध्ये स्टाइलिंग दिसत नाही. त्याची बाह्य रचना टीझरमध्ये देण्यात आली आहे. एक्सेटर मोठ्या एसयूव्हीसह स्टाइलिंग असण्याची शक्यता आहे ज्यात व्हेन्यू, क्रेटा आणि सांता फे यांचा समावेश आहे. त्याची लांबी सुमारे 3.8 मीटर असणे अपेक्षित आहे, जे कॅस्परच्या 3.6 मीटर लांबीपेक्षा जास्त आहे.

Hyundai Exter इंटिरियर आणि फीचर्स

इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर, नवीन छोटी SUV Hyundai Exter ला Grand i10 Nios आणि Venue SUV चे केबिन लेआउट आणि फीचर्स देण्यात आले आहेत. यात नवीन सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि नवीन 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट स्क्रीनसह डॅशबोर्ड मिळतो.

इन्फोटेनमेंट युनिट अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेला सपोर्ट करेल. हे कंपनीच्या ब्लूलिंक कनेक्टेड कार तंत्रज्ञानाला सपोर्ट करू शकते. मागील फोटोंवरून असे दिसून आले आहे की छोटी SUV सिंगल-पेन इलेक्ट्रिक सनरूफसह येईल. इतर वैशिष्ट्यांमध्ये मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील, ऑटोमॅटिक एसी, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, 6 एअरबॅग्ज, EBD आणि ABS यांचा समावेश असेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT