Hyundai-Kia Car Recall in US eSakal
विज्ञान-तंत्र

Hyundai-Kia Car Recall in US : ह्युंडाई-किया कारमध्ये आग लागण्याची भीती! कंपन्यांनी आपल्या ९२ हजार गाड्या मागवल्या परत

Car Recall : आपल्या गाड्या घरापासून दूर पार्क करण्याचं आवाहन देखील कंपन्यांनी केलं आहे.

Sudesh

ह्युंडाई आणि किया या कार बनवणाऱ्या कंपन्यांनी अमेरिकेतील ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. या कंपन्यांच्या नव्या गाड्यांमध्ये आग लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कंपन्यांनी अमेरिकेतील आपल्या सुमारे ९२ हजार गाड्या परत मागवल्या आहेत.

यामध्ये ह्युंडाई कंपनीच्या ५२ हजार, तर कियाच्या ४० हजार गाड्यांचा समावेश आहे. कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना अशी विनंती केली आहे की त्यांनी आपली गाडी दुरुस्त होईपर्यंत वापरू नये. सोबतच, आपल्या गाड्या घरापासून दूर पार्क करण्याचं आवाहन देखील कंपन्यांनी केलं आहे.

कोणत्या गाड्या मागवल्या परत?

ह्युंडाईने परत मागवलेल्या गाड्यांमध्ये 2023-24 सालच्या पॅलीसेड (Hyundai Palisade), २०२३ ची टक्सन, सोनाटा, इलँट्रा आणि कोना (Tucson, Sonata, Elantra and Kona) या गाड्यांचा समावेश आहे. तर कियाने सेल्टोस (Seltos), किया सोल (2023) आणि स्पोर्टेज (Kia Soul, Sportage) या गाड्यांना परत मागवलं आहे.

ह्युंडाई-किया गाड्यांमध्ये सारखीच खराबी

कियाने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला आपल्या गाड्यांमध्ये सहा टेक्निकल इश्यू मिळाले आहेत. यामुळे अद्याप कोणतंही नुकसान झालेलं नसल्याचंही कंपनीने स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे अशाच प्रकारचे चार इश्यू ह्युंडाईच्या गाड्यांमध्येही पहायला मिळाले. त्यातील एक पार्ट आपण मार्चमध्येच बदलला असल्याचं ह्युंडाईने स्पष्ट केलं.

ह्युंडाई कंपनीला गेल्या वर्षीच्या डिसेंबरपासूनच ग्राहकांच्या तक्रारी मिळाल्या होत्या, तर किया कंपनीला जूनपासून अशा तक्रारी मिळण्यास सुरुवात झाली. यानंतर कंपन्यांनी केलेल्या तपासामध्ये हे इश्यू समोर आले.

काय आहे इश्यू?

या गाड्यांच्या पंप असेम्ब्ली इलेक्ट्रॉनिक कंट्रोलरमध्ये त्रुटी आढळून आली आहे. यामुळे ओव्हरहीट होऊन गाडीमध्ये आग लागण्याची शक्यता आहे. कंपनी खराब असलेले पार्ट मोफत बदलून देणार आहे, ज्यासाठी ऑगस्ट अखेरीस आपल्या ग्राहकांशी संपर्क साधण्यात येणार आहे. यानंतर डीलर्स या गाड्यांची तपासणी करून, त्रुटी आढळल्यास ते पार्ट बदलतील.

डीलर पुरवणार पर्यायी कार

ह्युंडाईने आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी डीलर्सना निर्देश दिले आहेत. जोपर्यंत गाड्या दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत डीलर्स आपल्या ग्राहकांना रेंटल कार पुरवणार आहेत. तसेच, गाडीमध्ये काही खराबी आढळल्यास किंवा आगीची शक्यता दिसल्यास अशी गाडी थेट ह्युंडाई सेंटरला न्यावी असं आवाहन त्यांनी ग्राहकांना केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG Price Hike: महागाईचा झटका! गॅस कंपनीकडून सीएनजीच्या दरात मोठी वाढ, काय आहेत नवीन दर?

निकालानंतर मविआ की महायुती? वंचित कुणाशी युती करणार? प्रकाश आंबेडकरांनी ट्विटमधून सगळंच सांगितलं!

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Whatsapp Voice Note Transcription Feature : व्हॉट्सॲपवर जबरदस्त फीचरची एंट्री, पटकन बघून घ्या

High Court : ... तर तरुणाईचे आयुष्य होणार उद्ध्वस्त, उच्च न्यायालय : तस्करीला रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT