पुणे, ता. 06 : कोरोना व्हायरसमुळे जगभरातून चीनवर वेगवेगळे आरोप केले जात आहेत. भारतातही आता चायनिज वस्तू न वापरण्याची मोहिम नागरिकांनी सुरु केली आहे. त्यामुळे आता चायनिज कंपन्यांचे स्मार्टफोन वापऱणाऱे इतर पर्याय शोधत आहेत. देशातील टॉप टेन मोबाइल कंपन्यांपैकी शाओमी, विवो, रिअलमी, ओप्पो, टेक्नो, इनफिनिक्स आणि वनप्लस या चिनी कंपन्या आहेत. चीनच्या नसलेल्या कंपन्यांमध्ये सॅमसंग, एलजी, अॅपल, पॅनासोनिक यांचा समावेश आहे.
एलजीचे दोन स्मार्टफोन आहेत. LG W30 आणि LG W30 Pro या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सल + 5 मेगापिक्सल आणि 8 मेगापिक्सल कॅमेरे आहेत. याशिवाय फ्रंटला 16 मेगापिक्सल कॅमेरा आहे. बॅटरी बॅकअपही जबरदस्त असून 4000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
सॅमसंगच्या M-सीरीज मधील Galaxy M30s हा स्मार्टफोनही पर्याय ठरू शकतो. यामध्ये 48 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा असून M31 मध्ये 64MP क्वाड कॅमेरा दिला आहे. दोन्ही फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी आहे. एम 30 एस आणि एम 31 मध्ये अनुक्रमे 16 आणि 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
सॅमसंगचे Note 10 Lite आणि S10 lite हे स्मार्टफोनही चांगले आहेत. यात नोट 10 लाइटमध्ये 12+12+12 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा आणि S10 Lite मध्ये 48+12+5 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. दोन्हींमध्ये 4500mAh बॅटरी आणि सेल्फीसाठी 32 मेगापिक्सल कॅमेरा आहे.
कॅमेरा फ्लिप करता येणाऱ्या Asus 6Z मध्ये स्नॅपड्रॅगन 855 फ्लॅगशिप प्रोसेसर आहे. यामध्ये 48 मेगापिक्सल आणि 13 मेगापिक्सल ड्युअल कॅमेरा आहे. कॅमेरा फ्लिप होऊन फ्रंट कॅमेरा म्हणून वापरता येतो. यात 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे. तसंच नॉचलेस डिस्प्लेसुद्धा मिळणार आहे.
Asus चा ROG Phone 2 फोन 120Hz अॅमोलेड स्क्रीन असलेला असून यात स्नॅपड्रॅगन 855 प्लस प्रोसेसर आहे. 48 मेगापिक्सल IMX586 सोनी सेंसर असलेला ड्युअल कॅमेरा आहे. याशिवाय 24 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीची क्षमता 6000mAh इतकी आहे.
Google Pixel 3a फोनमध्ये 5.6 इंचाचा OLED डिस्प्ले आहे. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 670 प्रोसेसर असून 12.2 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. 3000 mAh क्षमतेची बॅटरी असलेल्या या फोनमध्ये लेटेस्ट अँड्रॉइड 9.0 पाई ओएस आहे.
Samsung Galaxy S20 या स्मार्टफोनमध्ये 6.2 इंच क्वाड एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. 12MP प्रायमरी कॅमेरा असून सोबत 64 मेगापिक्सल टेलिफोटो लेन्सही देण्यात आली आहे. कॅमेऱ्यात 3X चा हायब्रिड झूम आणि आणि 30X डिजिटल झूम करता येतं.
LG G8X ThinQ फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर देण्यात आला आहे. क्वॉलकॉम क्विक चार्ज 3.0 असून 4000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये 12 मेगापिक्सलचा स्टँडर्ड आणि 13 मेगापिक्सलचा सुपर वाइड लेन्स असलेला कॅमेरा आहे. याशिवाय सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
गुगलच्या पिक्सल 3 XL मध्ये 6.3 इंचाची QHD+ फ्लेक्सिबल OLED स्क्रीन आहे. 3430mAh क्षमतेची बॅटरी असून कंपनीने असा दावा केला आहे की एकदा चार्जिंग केल्यानंतर 7 तास 15 मिनिटे फोन चालतो. 12.2 मेगापिक्सलचा रिअऱ कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल कॅमेरा आहे.
अॅपलच्या लेटेस्ट iPhone 11 सीरीजमध्ये जबरदस्त कॅमेरा क्वालिटी देण्यात आली आहे. iPhone 11 Pro Max मध्ये ट्रिपल कॅमेऱा आहे. तर स्टँडर्ड मॉडेलमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. या सिरीजमधील फोनमध्ये अॅपलचा लेटेस्ट A13 बायोनिक प्रोसेसर आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.