दिवाळीच्या आधी पुष्य नक्षत्राच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. दागिने, वाहन, कपडे आणि अन्य गोष्टींची खरेदी करण्यासाठी हा मुहूर्त अगदी शुभ मानला जातो. यावर्षी 4 आणि 5 नोव्हेंबर या दोन दिवशी खरेदीचा हा मुहूर्त असणार आहे. या मुहूर्तावर जर तुम्ही नवीन कार घेणार असाल, तर सोबत काही अॅक्सेसरीज घेणं विसरु नका.
कित्येक गाड्यांच्या बेस व्हेरियंटसोबत अगदी कमी अॅक्सेसरीज मिळतात. यामुळे अशी कार घेत असताना सोबत काही अॅक्सेसरीज घेणं गरजेचं आहे. कारच्या सेफ्टी आणि सिक्युरिटीसाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची यादी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
जेव्हा तुमच्या कारच्या शेजारुन एखादी कार किंवा बाईक जात असते, तेव्हा एका पॉइंटला ती रिअर व्ह्यू मिररमध्ये दिसत नाही. याला ब्लाइंट स्पॉट म्हणतात. हा ब्लाइंड स्पॉट कव्हर करण्यासाठी विशेष कॉन्व्हेक्स मिरर मिळतात. यामुळे वाईड अँगल व्ह्यू मिळतो आणि अपघाताची शक्यता कमी होते.
कित्येक गाड्यांच्या बेस व्हेरियंटमध्ये रिव्हर्स पार्किंगसाठी कॅमेरा किंवा सेन्सर उपलब्ध नसतात. त्यामुळे कारसोबत वेगळी अॅक्सेसरी म्हणून असा कॅमेरा विकत घेणं गरजेचं आहे. यामुळे पार्क करताना किंवा रिव्हर्स जाताना होऊ शकणारे अपघात टाळता येतात.
रात्रीच्या वेळी जेव्हा तुम्ही गाडी रस्त्याच्या बाजूला लावता, तेव्हा दार उघडल्यानंतर कदाचित मागून येणाऱ्या गाड्यांना ते दिसण्याची शक्यता कमी असते. डोअर वॉर्निंग लाईटमुळे मागून येणाऱ्या गाड्यांना तुमच्या कारचा दरवाजा स्पष्टपणे दिसतो आणि अपघात टळतो. या लाईट्स कारचा दरवाजा उघडताच आपोआप सुरू होतात.
तुमच्या कारच्या टायरमध्ये किती हवा आहे हे तपासण्यासाठी ही सिस्टीम उपयोगी येते. यामध्ये चारही टायर्सच्या व्हॉल्ववर सेन्सर बसवण्यात येतात. हे सेन्सर तुम्हाला एका डिव्हाईसवर टायरचे प्रेशर सांगतात. हे डिव्हाईस कारच्या डॅशबोर्डवर ठेवता येतं, आणि तिथेच ते सोलर एनर्जीवर चार्ज होतं. (Tech News)
यासोबतच एअर प्युरिफायर, डॅशकॅम, सोलर पॉवर फॅन, ओबीडी स्कॅनर, लेझर स्टॉप लॅम्प असे कित्येक गॅजेट्स देखील तुम्ही घेऊ शकता. यामुळे तुमचा कार चालवण्याचा अनुभव अधिक चांगला आणि सुरक्षित होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.