Important Documents esakal
विज्ञान-तंत्र

Surrender Document After Death: मृत्यूनंतर तुमच्या आधार, पॅनकार्डचा कोणी गैरवापर केला तर?

तुमचे डॉक्युमेंट Block करता येतात? कसं ते वाचा

Pooja Karande-Kadam

 Important Documents : भारत सरकारीची काही महत्वाची कागदपत्रे तुमची ओळख बनली आहेत. व्यक्ती स्वत: हजर असला तरी आधार कार्ड असेल तरच तो कायदेशीर गोष्टी पुर्ण करू शकतो. अशा या महत्वाच्या कागदपत्रांचा गैरवापर होण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे.

व्यक्ती हयात असताना तिच्या कागदपत्रांचा होणारा गैरपावर थांबवता येईल. पण, ती मेल्यानंतर त्या Document चं काय हा प्रश्न आहेच.

एखाद्या व्यक्तीचं ओळखपत्र असलेले आधारकार्ड, पॅनकार्ड हरवले तर तो लगेचच तक्रार दाखल करू शकतो. पण तो मेल्यावर कसा कागदपत्र शोधणार. त्याच्या कुटुंबियांना तरी त्याच्या कागदपत्रांची काळजी असेल का? यात शंकाच आहे.

सध्या प्रत्येकाकडे आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट अशी महत्त्वाची कागदपत्रे आहेत. कारण त्याशिवाय तुमचे कोणतेही काम थांबत नाही.

ही कागदपत्रे पत्ता आणि ओळख पुरावा म्हणून वापरली जातात. सरकारच्या दृष्टीने हा एक प्रकारे तुमच्या जिवंत असल्याचा पुरावा आहे. त्याशिवाय तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा गैर-सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकत नाही.

तुम्ही मेल्यावर कोणी याचा गैरवापर करू नये म्हणून आत्ताच ही काही काम करून ठेवा. ज्याचा तुमच्या कुटुंबियांना त्रास होणार नाही.

महत्त्वाची कागदपत्रे

  • वोटिंग कार्ड

  • आधार कार्ड

  • पॅन कार्ड

  • पासपोर्ट

जर मृत व्यक्तीचं वोटिंग कार्ड रद्द केलं नाही, तर त्याद्वारे बोगस मतदान होण्याचा धोका असतो. त्यामुळे मृत व्यक्तीचं वोटिंग कार्ड रद्द करणं महत्त्वाचं असतं आणि अनिवार्यही! त्यामुळे वोटिंग कार्ड रद्द करण्यासाठी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना निवडणूक कार्यालयात जाऊन फॉम-7 भरावा लागतो. त्यासाठी डेथ सर्टिफिकेट (Death Certificate) अर्थात मृत्यू प्रमाणपत्राची गरज लागते.

आधार कार्ड

सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेन्ट असलेल्या आधार कार्डबाबत भरपूर सतर्कता बाळगण्याची गरज आहे. अर्थात यूनिक आयडेंटिफिकेशन आयटीमुळे आधार कार्ड रद्द केलं जाऊ शकत नाही.

पण ते ब्लॉक निश्चितच केलं जाऊ शकतं. त्यासाठी uidai.gov.in या संकेतस्थळावर जाऊन काही औपचारीकता पार पाडावी लागते. My Aadhaar मधील आधार सर्विसेज सेक्शनमध्ये आधार लॉक आणि अनब्लॉक हे पर्याय वापरता येऊ शकतात.

आधार ब्लॉक करायचंय?

  • Lock and Unblock वर क्लिक करा

  • तुम्हाला Lock UID आणि Unlock UID असे दोन पर्याय दिसतील

  • Lock UID bj क्लिक करा

  • यानंतर 12 अंकी आधार कार्ड नंबर , नाव आणि आपला पिनकोड भरा

  • स्क्रिनवर दिसणाऱ्या सिक्युरीटी कोडचा वापर केल्यानंतर ओटीपी किंवा टी-ओटीपी ऑप्शन दिसतील.

  • कोणत्याही एका ऑप्शनवर क्लिक करुन मृत व्यक्तीचं आधार कार्ड तुम्हाला ब्लॉक करता येते

पॅनकार्ड

पॅनकार्डधारकाच्या मृत्यूनंतर, त्याच्या नातेवाईकांनी मृताचे पॅनकार्ड सरेंडर करावे. यासाठी तुम्हाला आयकर विभागाशी संपर्क साधावा लागेल. पॅन कार्ड सरेंडर करण्यापूर्वी, मृत व्यक्तीची सर्व खाती दुसऱ्याच्या नावावर हस्तांतरित करा किंवा ती बंद करा.

पासपोर्ट

पासपोर्ट रद्द करण्याची तरतूद नाही. जेव्हा त्याची वैधता संपते तेव्हा ते अवैध होते. अशा स्थितीत ते तोपर्यंत जपून ठेवा, जेणेकरून ते चुकीच्या हातात पडणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT