How to Download Your 'Har Ghar Tiranga' Certificate esakal
विज्ञान-तंत्र

Independence Day 2024 : स्वातंत्र्याचा उत्सव! 'हर घर तिरंगा' अभियानाचे तिसरे पर्व; सोप्या स्टेप्स वापरुन डाउनलोड करा ऑनलाईन सर्टिफिकेट

Har Ghar Tiranga Certificate Download : ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम पुन्हा एकदा जोमाने सुरू झाली आहे.'हर घर तिरंगा’ सर्टिफिकेट कसे डाउनलोड करायचे जाणून घ्या.

Saisimran Ghashi

Har Ghar Tiranga Campaign : भारत देश 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यास सज्ज झाला आहे. यानिमित्ताने ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम पुन्हा एकदा जोमाने सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ध्वजाचा फोटो तुमच्या प्रोफाइल पिक्चरवर लावण्याचे आणि ध्वजासह स्वतःचा फोटो शेअर करण्याचे आवाहन केले आहे.

'आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत सुरू झालेली 'हर घर तिरंगा' मोहीम आता तिसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे. या वर्षी 13 ऑगस्ट रोजी खास 'तिरंगा बाइक रॅली' देखील होणार आहे. या रॅलीमध्ये खासदार सहभागी होणार असून ही रॅली भारत मंडप, प्रगति मैदान येथून सुरू होऊन भारत गेटच्या मार्गाने मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे संपणार आहे.

या मोहिमेमध्ये सहभागी होणाऱ्याला आकर्षक 'हर घर तिरंगा' प्रमाणपत्र मिळवण्याची संधीही आहे. यासाठी घरांवर तिरंगा फडकावून त्याचा फोटो घ्या आणि harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करा. असे केल्यावर तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल.

2022 पासून सुरू झालेल्या या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या वर्षी, 23 कोटींहून अधिक घरांवर तिरंगा फडकावला गेला आणि harghartiranga.com या संकेतस्थळावर 6 कोटींहून अधिक स्वेल्फी अपलोड करण्यात आले. 2023 मध्येही हा उत्साह कायम राहिला आणि 10 कोटींहून अधिक स्वेल्फी अपलोड करण्यात आले. या वर्षीही ही मोहीम राष्ट्रीय अभिमान वाढवण्यावर आणि तिरंग्याचे महत्त्व अधोरेखित करण्यावर भर देत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 ऑगस्ट रोजी नागरिकांना पुन्हा एकदा 'हर घर तिरंगा' अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्वतःचा प्रोफाइल पिक्चर भारतीय ध्वजासह केला असून सर्वांनाही असे करण्याचे सांगितले आहे.

“या वर्षीचा स्वातंत्र्यदिन जसजसा जवळ येत आहे, तसतसा #हरघरतिरंगा पुन्हा एकदा चिरस्मरणीय करूया. मी माझा प्रोफाइल पिक्चर बदलला आहे आणि आपण सर्वांना माझ्यासोबत स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आमच्या तिरंग्याचे स्वागत करण्यासाठी सामील व्हावे असे आवाहन करतो. होय, आणि तुमचे स्वेल्फी https://harghartiranga.com या संकेतस्थळावर शेअर करा,” असे त्यांनी म्हटले.

'हर घर तिरंगा’ सर्टिफिकेट कसे डाउनलोड करायचे?

  • harghartiranga.com वर जा आणि ‘अपलोड सेल्फी’ पर्याय निवडा.

  • सहभागी होण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी “क्लिक टू पार्टिसिपेट” वर क्लिक करा.

  • तुमचे नाव, फोन नंबर, देश आणि राज्य द्या आणि नंतर तुमचा फोटो अपलोड करा.

  • “मी माझ्या चित्राचा वापर पोर्टलवर करण्यास परवानगी देतो” हा करार वाचा आणि स्वीकारा, नंतर ‘सबमिट’ वर क्लिक करा.

  • तुमचे सर्टिफिकेट मिळविण्यासाठी “जनरेट सर्टिफिकेट” वर क्लिक करा. तुम्ही ते डाउनलोड बटण वापरून डाउनलोड करू शकता किंवा प्रदान केलेल्या पर्यायांचा वापर करून ऑनलाइन शेअर करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Latest Maharashtra News Updates : एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार स्थापन होणार : रामदास आठवले

SCROLL FOR NEXT