Atal Setu Technology esakal
विज्ञान-तंत्र

Atal Setu Technology: भूकंप देखील सहन करणार अटल सागरी सेतू! देशाच्या सर्वात मोठ्या पूलासाठी झालाय या 7 टेक्नॉलॉजीचा वापर

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमध्ये सात तंत्रज्ञानाचा वापर!

Aishwarya Musale

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL ) म्हणजेच अटल सेतू या प्रकल्पाचे १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते उदघाटन झालं आहे. सागरी सेतू जगातील सर्वात लांब पुलांपैकी एक आहे. अटल सेतू मुंबईतील शिवडी येथून सुरू होऊन नवी मुंबईतील चिर्ले येथे संपणार आहे.

आता या पुलाच्या मदतीने आपण नवी मुंबई ते मुंबई हे अंतर अवघ्या 20 मिनिटांत पूर्ण करू शकणार आहोत. 17,840 कोटींहून अधिक खर्च करून बांधण्यात आलेला हा पूल अनेक हाय-टेक टेक्नोलॉजीसह येतो. डिसेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान मोदींनी या पुलाची पायाभरणी केली होती. या पुलाची लांबी 21.8 किलोमीटर असून हा 6 लेनचा पूल आहे.

1. 6.5 रिश्टर तीव्रतेचा भूकंप सहन करू शकतो

या पुलाच्या पायथ्यामध्ये आयसोलेशन बेअरिंगचा वापर करण्यात आला आहे. या ब्रिज संपूर्णपणे भूकंपरोधक बांधकामा अंतर्गत तयार करण्यात आला आहे. विविध प्रकाराच्या भूकंपाच्या धक्क्यांना तो सहन करु शकतो. अगदी 6.5 रिश्टर स्केलचा भूकंपाच्या धक्क्यातही या ब्रिजला धोका पोहचणार नसल्याचे म्हटले जाते.

2. या पुलामुळे आवाज कमी होईल

या पुलामध्ये नॉईज बॅरिअर्सचा वापर करण्यात आला असून, ते काठावर बसवण्यात आले आहेत. याशिवाय, यात सायलेन्सर देखील आहेत, जे आवाज कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे सागरी जीव आणि पुलावरून प्रवास करणाऱ्या लोकांना आवाजाचा सामना करावा लागणार नाही.

3. इको फ्रेंडली लाइटिंगचा वापर करण्यात आला आहे

या पुलाच्या लाइटिंग सिस्टमसाठी कमी उर्जेचे एलईडी लाईट वापरण्यात आले आहेत. हे लाईट आजूबाजूच्या सागरी जीवांना त्रास देणार नाहीत.

4. यात विशेष टोल प्रणाली आहे

MTHL वर ओपन रोड टोलींग प्रणाली असणार आहे. त्यामुळे टोलनाक्यांवर लागणाऱ्या लांबच लांब रांगांपासून सुटका होणार आहे. प्रगत स्कॅनर वाहनांना स्कॅन करुन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल वसूल करणार आहेत.

5. तुम्हाला रिअल टाइम ट्रॅफिक माहिती मिळेल

या पुलावर चालकांना रिअल-टाइम माहिती देण्यासाठी ठराविक अंतराने डिस्प्ले देखील लावलेले असतील. त्यामुळे मार्गावरील वाहतूक कोंडी किंवा अपघातांबद्दल सूचना या डिस्प्लेवर मिळणार आहेत.

6. स्टील प्लेटचा वापर

या पुलाच्या डेक डिझाइनमध्ये स्टील प्लेटचा आधार देण्यात आला आहे. यासह, स्टील बीमचा आधार समाविष्ट आहे. त्यामुळे पुलाचे आयुर्मान वाढेल. हे ट्रेडिशनल कॉंक्रिटपेक्षा हलके आणि मजबूत आहे. अशा स्थितीत जोरदार वाऱ्यात पूल मजबूत करण्याचे काम होईल.

7. रिव्हर्स सर्कुलेशन रिग्स

ध्वनी आणि कंपन कमी करण्यासाठी रिव्हर्स सर्कुलेशन रिग्स तंत्रज्ञान वापरले आहे. त्यामुळे या परिसरातीस सागरी जीवांचे रक्षण होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपचे 'ते' दोन नेते फडणवीसांच्या जवळचे, मात्र लढावे लागणार 'धनुष्यबाणा'वर; कारण काय?

Emerging Asia Cup: भारताला हरवणाऱ्या अफगाणिस्तानने मिळवले जेतेपद ! फायनलमध्ये श्रीलंकेवर केली मात

Congress Candidates List: काँग्रेसकडून आणखी १४ उमेदवारांच्या नावाची घोषणा, जाणून घ्या कुणाला कुठून मिळाली उमेदवारी?

IND vs NZ: राधा यादव लढली! बॉलिंगही केली, बॅटिंगही केली, पण टीम इंडिया हरली; न्यूझीलंडची मालिकेत बरोबरी

ShivSena Candidate List: दिग्गज नेत्यांची वर्णी; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, किती शिलेदार उतरले मैदानात?

SCROLL FOR NEXT