India e-Air Taxi : भारतात आता लवकरच एअर टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. यासाठी जास्त वाट पाहण्याची देखील गरज नाही. इंटरग्लोब एंटरप्रायजेस आणि अमेरिकेतील आर्चर एव्हिएश ही कंपनी 2026 सालापर्यंत इलेक्ट्रिक एअर टॅक्सी सेवा सुरू करण्याच्या विचारात आहे. गुरूवारी याबाबत घोषणा करण्यात आली.
देशातील कित्येक शहरांमध्ये ट्रॅफिक आणि प्रदूषण या दोन्ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामध्ये जर ई-एअर टॅक्सीला परवानगी मिळाली, तर या दोन्ही गोष्टींवर मात करणं सहज शक्य होणार आहे. परवडणाऱ्या दरात ही सेवा देणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.
आर्चर एव्हिएशन ही कंपनी इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेकऑफ अँड लँडिंग (EVOL) विमानं बनवते. शहरामध्ये एअर ट्रान्सपोर्ट करण्यासाठी हे अगदी आयडियल विमान समजलं जातं. 'मिडनाईट' नावाच्या या विमानात चार प्रवासी आणि एक पायलट बसू शकतात. याची रेंज सुमारे 161 किलोमीटर एवढी आहे.
सुरुवातीला भारतातील दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू या तीन शहरांमध्ये ही टॅक्सी सेवा सुरू करण्याचा कंपनीचा विचार आहे. यासाठी 200 विमानं तैनात करण्यात येतील. दिल्लीमध्ये कारने प्रवास करताना जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला 90 मिनिटं लागतात, तर तेवढ्याच अंतरासाठी एअर टॅक्सीमध्ये सुमारे 7 मिनिटं लागतील.
यासोबतच इंटरग्लोब एंटरप्रायजेस ही कंपनी कार्गो, लॉजिस्टिक्स, मेडिकल आणि आपातकालीन परिस्थितीसाठी ई-विमान वापरण्याच्या विचारात आहे. सोबतच, चार्टर सेवेसाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. (Tech News)
आर्चर कंपनीने यापूर्वीच अमेरिकेच्या हवाई दलाला आपली सहा मिडनाईट विमानं विकली आहेत. तसंच, पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये संयुक्त अरब इमिरातीमध्ये एअर टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे. दुबईमध्ये याचा काय दर असेल त्यावरुन भारतातील दराचा अंदाज येऊ शकतो. मात्र, अजूनही सामान्यांना यातून फिरणं परवडेल असं दिसत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.