2030 सालापर्यंत देशाची हरित उर्जा क्षमता ही 500 गिगावॅट करण्याचं लक्ष्य भारताने डोळ्यासमोर ठेवलं आहे. हे लक्ष्य वेळेपूर्वीच पूर्ण होईल, असं मत आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे संचालक अजय माथुर यांनी व्यक्त केलं. ते पीटीआयशी बोलत होते.
माथुर हे पंतप्रधान मोदी यांच्या हवामान बदलाबद्दल असणाऱ्या परिषदेचे सदस्य देखील आहेत. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, की पर्यावरणासाठी जागतिक स्तरावर होणाऱ्या निधीचं वाटप हे असमान आहे.
सौर उर्जेसाठीची 70 टक्के गुंतवणूक ही चीन आणि इतर श्रीमंत देशांमध्ये होते. तर, आफ्रिकेकडे क्षमता असूनही तिकडे केवळ 4 टक्के गुंतवणूक होते. आफ्रिका आणि अशाच इतर देशांमध्ये गुंतवणूक न झाल्यास, भविष्यात मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळेच जी-20 अध्यक्षपद आपल्याकडे असताना, जागतिक बँकांकडून या देशांना सौरउर्जेसाठी कर्ज मिळावं यासाठी भारत प्रयत्न करेल, असंही माथुर म्हणाले. (National News)
G20 परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळाल्यामुळे, या कालावधीत बहुस्तरीय बँकांच्या यंत्रणेत सुधारणा घडवून आणण्यासाठी भारत प्रयत्न करेल. यासोबतच, अपारंपारिक उर्जेबाबत गुंतवणूक करण्यालाही प्राधान्य दिलं जात आहे. सोबतच, G20 परिषदेसाठी भारताने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला देखील निमंत्रित केलं असल्याची माहिती माथुर यांनी दिली.
सौर उर्जेसाठीची 70 टक्के गुंतवणूक ही चीन आणि इतर श्रीमंत देशांमध्ये होते. तर, आफ्रिकेकडे क्षमता असूनही तिकडे केवळ 4 टक्के गुंतवणूक होते. आफ्रिका आणि अशाच इतर देशांमध्ये गुंतवणूक न झाल्यास, भविष्यात मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळेच जी-20 अध्यक्षपद आपल्याकडे असताना, जागतिक बँकांकडून या देशांना सौरउर्जेसाठी कर्ज मिळावं यासाठी भारत प्रयत्न करेल, असंही माथुर म्हणाले.
इलेक्ट्रिक बॅटरींच्या किंमती 2025 सालापर्यंत कमी होऊ शकतात, असं माथुर यांनी यावेळी म्हटलं. यामुळेच 2030 पूर्वी भारत आपलं 500 GW अक्षय्य उर्जेचं लक्ष्य गाठू शकणार आहे असा दावा त्यांनी केला. पंतप्रधान मोदींनी 2021 साली ग्लासगो क्लायमेट परिषदेमध्ये दिलेल्या पाच वचनांपैकी हे एक वचन आहे, असंही ते म्हणाले.
बॅटरींच्या किंमती कमी झाल्यामुळे, 500 GW सौरउर्जा स्टोअर करण्यासाठी भरपूर प्रमाणात बॅटरी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे हे लक्ष्य आपण लवकर गाठू, तसंच 2030 पर्यंत आपण त्याही पुढे जाऊ असं माथुर म्हणाले.
बॅटरी टेक्नॉलॉजीमध्ये होणारी प्रगती, आणि कंपन्यांमध्ये वाढलेली स्पर्धा या कारणांमुळे बॅटरींच्या किंमती भविष्यात कमी होऊ शकतात, असं माथुर म्हणाले. हे खरंतर येत्या दोन वर्षांमध्येच होईल असा दावाही त्यांनी केला. सोबतच, बॅटरी बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची किंमतही कमी होत आहे; आणि विविध प्रकारच्या बॅटरी तयार होत आहेत. यामुळे देखील बॅटरीज स्वस्त होऊ शकतात, असं ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.