Google Youtube  Sakal
विज्ञान-तंत्र

ये नया हिंदुस्तान है! Google, Youtube पासून Starbucks पर्यंत सगळीकडे भारतीयांचा डंका

भारताचा विकास ज्या पद्धतीने सुरू आहे ते पाहून जगभरात फक्त आणि फक्त भारताचीच चर्चा केली जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

Indian Origin CEOs In Biggest Companies : भारताचा विकास ज्या पद्धतीने सुरू आहे ते पाहून जगभरात फक्त आणि फक्त भारताचीच चर्चा केली जात आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

भारत करत असलेल्या प्रत्येक बारीक गोष्टीकडे जगातील प्रत्येक देशाचे लक्ष असून, प्रत्येक क्षेत्रात भारतीयांनी स्वतःला सिद्ध केले आहे.

असे एकही क्षेत्र नाही जिथे भारतीय नाही. आज आम्ही अशाच काही भारतीयांबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यांच्यामुळे जगभर भारताचा डंका वाजत आहे.

जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube वर एका भारतीयाने अव्वल स्थान पटकावले आहे. भारतीय वंशाचे नील मोहन आता यूट्यूबचे पुढील सीईओ असणार आहेत. यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने गुरुवारी 16 फेब्रुवारी रोजी याबाबत माहिती दिली आहे.

यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेटचे सीईओदेखील भारतीय असून, अल्फाबेटचे नेतृत्व सध्या सुंदर पिचाई यांच्याकडे आहे.

Google देखील या कंपनीचा एक भाग आहे. या अर्थाने बघितले गेल्यास गुगलचे सीईओदेखील सुंदर पिचाईच आहेत. सुंदर पिचाई यांना 2015 मध्ये गुगलचे सीईओ बनवण्यात आले होते. त्यानंतर ते 2019 मध्ये अल्फाबेटचे सीईओ बनले.

मायक्रोसॉफ्टवरही भारतीयांची पकड

सत्या नाडेला हे जगातील सर्वात लोकप्रिय मायक्रोसॉफ्टचे सीईओ आहेत. याआधी ते क्लाउड आणि एंटरप्राइज ग्रुपचे कार्यकारी उपाध्यक्ष राहिले आहेत.

मायक्रोसॉफ्टसह IBM देखील भारतीयांच्याच ताब्यात असून, आयबीएमचे अध्यक्ष आणि सीईओ अरविंद कृष्णा आहेत. कृष्णा यांनी आयआयटी कानपूरमधून शिक्षण घेतले असून, ते फेडरल बँक ऑफ न्यूयॉर्कच्या संचालक मंडळावरही आहेत.

Adobe च्या CEO पदी शंतनू नारायण

शंतनू नारायण हे दिग्गज आयटी कंपनी Adobe चे CEO आहेत. 1998 मध्ये Adobe मध्ये रूजू होण्यापूर्वी नारायण यांनी 1986 मध्ये सिलिकॉन व्हॅली स्टार्ट-अप Majorx Automation Systems मध्ये काम केले आहे. यानंतर त्यांनी 1989 ते 1995 पर्यंत अॅपलसाठी काम केले.

Vimeo च्या CEO पदाची जबाबदारी सध्या अंजली सूद यांच्याकडे असून, चॅनेलच्या सीईओ पदाची धुरा लीना नायर यांच्याकडे आहे.

वरील कंपन्याशिवाय स्टारबक्सचे सीईओपदावरदेखील भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन आहेत. FedEx मध्येही भारतीयांचा डंका आहे. राज सुब्रमण्यम हे FedEx चे CEO आहेत. त्याचप्रमाणे Vmware चे CEO हे भारतीय वंशाचे रघु रघुराम आहेत.

निकेश अरोरा हे पालो अल्टोचे सीईओ असून, Netapp च्या CEO पदावर भारतीय वंशाचे जॉर्ज कुरियन आहेत. गुगल क्लाउडची मालकी भारतीय थॉमस कुरियन यांच्याकडे असून, देविका बुलचंदानी या ओगिल्वीच्या सीईओ आहेत.

जगभरातील दिग्गज कंपन्यांच्या प्रमुखपदाची जबाबदारी जवळपास भारतीय नागरिकांच्या खांद्यांवर असून, त्यांच्या कार्यतून सर्वजण भारताचा आणि भारतीयांचा मान उंचावण्याचे काम करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : दक्षिण नागपूर मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे मोहन मते 15573 मतांनी विजयी

Harish Pimple Won Murtizapur Assembly Election 2024: भाजप उमेदवार हरीश पिंपळे तिसऱ्यांदा विजयी!

Chiplun Assembly Election 2024 Results : चिपळूण विधानसभा निवडणुकीत शेखर निकमांनी राखला गड; प्रशांत यादवांचा पराभव

Purandar Assembly Election 2024 Result Live: तिरंगी लढतीत विजय शिवतारेंनी पुरंदरचा 'गड' राखला, संजय जगताप यांना धोबीपछाड

Sajid Khan Pathan won Akola West Election 2024: भाजपचा बालेकिल्ला काँग्रसने जिंकला! अकोला पश्चिममध्ये साजिद खान पठाण करणार 'राज्य'

SCROLL FOR NEXT