Indian Railway Super App eSakal
विज्ञान-तंत्र

Indian Railway Super App : प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे तयार करतंय 'सुपर अ‍ॅप'; अनेक सुविधा मिळणार एकाच ठिकाणी

सध्या तिकीट बुकिंगसाठी रेल्वेचं IRCTC अ‍ॅप उपलब्ध आहे. मात्र, इतर गोष्टींसाठी प्रवाशांना विविध अ‍ॅप्स घ्यावे लागतात.

Sudesh

Railway Super App : इंडियन रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सेवेसाठी एक सुपर अ‍ॅप तयार करत आहे. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी लोकांना फायदा होणार आहे. रेल्वेचं तिकीट बुक करणे, रेल्वे ट्रॅक करणे, जेवण ऑर्डर करणे, तक्रार दाखल करणे आणि अशाच अनेक सुविधा या एकाच अ‍ॅपवर उपलब्ध करण्यात येणार आहेत.

एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यासाठी रेल्वे मंत्रालयाने 90 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. रेल्वेची आयटी विंग, म्हणजेच CRIS या अ‍ॅपची निर्मिती करणार आहे. एबीपीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. (Indian Railway Apps)

काय असणार यात?

नवीन सुपर अ‍ॅपमध्ये रेल मदद, UTS, नॅशनल ट्रेन एन्क्वायरी सिस्टीम, पोर्टरीड, सतर्क, IRCTC रेल कनेक्ट, IRCTC ई-केटरिंग, IRCTC एअर अशा कित्येक सुविधा इंटिग्रेट होणार आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींसाठी यूजर्सना वेगवेगळे अ‍ॅप्स घ्यावे लागणार नाहीत. तसंच, लोकांना अधिक चांगला यूजर एक्सपिरियन्स मिळणार आहे.

सध्या तिकीट बुकिंगसाठी रेल्वेचं IRCTC अ‍ॅप उपलब्ध आहे. मात्र, इतर गोष्टींसाठी प्रवाशांना विविध अ‍ॅप्स घ्यावे लागतात. नवीन सुपर अ‍ॅप लाँच झाल्यानंतर यूजर्सना केवळ एकच अ‍ॅप पुरेसं असणार आहे. (Railway ticket Booking Apps)

2023 या आर्थिक वर्षामध्ये झालेल्या एकूण रेल्वे तिकीट बुकिंगपैकी सुमारे 5,60,000 बुकिंग्स या IRCTC अ‍ॅपच्या माध्यमातून करण्यात आल्या होत्या. ही संख्या एकूण बुकिंगच्या निम्मी आहे. म्हणजेच, मोठ्या प्रमाणात लोक IRCTC अ‍ॅपचा वापर करत आहेत. आता रेल्वेने इतर सुविधा देखील एकाच अ‍ॅपमध्ये दिल्यास आणखी लोकही याचा वापर सुरू करतील, असं म्हटलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT