Mobile Addiction in Indians : सध्या आपण सर्वच तंत्रज्ञानाने वेढलेलो आहोत. जगात इतर देशांमध्ये तंत्रज्ञान अधिक प्रगत असलं, तरी स्मार्टफोनच्या व्यसनात भारतीय पुढे असल्याचं स्पष्ट झालं आहे. इनमोबी या संस्थेने हा धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे. भारतातील लोक हे जगातील इतर लोकांच्या तुलनेत सरासरी एक तास जास्त मोबाईल वापरतात हे या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
जगभरातील लोक हे दिवसाला सरासरी 3 तास 15 मिनिटे स्मार्टफोन वापरतात. तर, भारतातील लोक हे दिवसाला सरासरी 4 तास 5 मिनिटे स्मार्टफोन वापरतात असं या संशोधनात स्पष्ट झालं. भारतात एका वेळी सुमारे 88.10 कोटी लोक मोबाईलवर सक्रिय असतात असंही यात म्हटलं आहे. (Average Indian Smartphone Use)
भारतीय लोक आपल्या स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर सोशल मीडियासाठी करतात. त्यानंतर फोटो किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करणं, ऑनलाईन गेम्स खेळणं आणि मूव्ही/सीरीज पाहणं यासाठी मोबाईलचा सर्वाधिक वापर होतो. एकंदरीत भारतीय लोक स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर हा मनोरंजनासाठी करतात. इतर कामाच्या गोष्टींसाठी मोबाईलचा सर्वात कमी वापर केला जात असल्याचं या रिसर्चमध्ये स्पष्ट झालं आहे. (Smartphone Addiction)
स्मार्टफोन आणि इंटरनेट दोन्ही गोष्टी स्वस्त होत असल्यामुळे यूजर्स मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या रिपोर्टमध्ये असा अंदाज व्यक्त केला आहे, की पुढील 6 वर्षांमध्ये भारतातील इंटरनेट बिझनेस हा तब्बल 83 लाख कोटी रुपयांचा होईल. तर, स्मार्टफोन बिझनेस देखील 2032 सालापर्यंत 7.43 लाख कोटींचा होण्याची शक्यता आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.