India’s first 3d printed post office Sakal
विज्ञान-तंत्र

3D Concrete Printing Technology : आता विटा-दगडांशिवाय बनणार स्वस्त व टिकाऊ घर! देशातील पहिल्या पोस्ट ऑफिसचं बांधकाम पूर्ण

सामान्यतः बांधकाम तयार करण्यासाठी वीट वापरली जाते. पण 3D प्रिंटिंगद्वारे तयार केलेल्या बांधकामात, क्वचितच ब्लॉक वापरले जातात किंवा तेही वापरले जात नाहीत. या तंत्राने कमी वेळेत बांधकाम पूर्ण करता येईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जाणून घ्या काय आहे हे तंत्र.

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बंगळुरूमध्ये 3D प्रिंटिंगने बनवलेल्या पोस्ट ऑफिसचे उद्घाटन केलं आहे. थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाने बनवलेले हे देशातील पहिले पोस्ट ऑफिस आहे. बंगळुरूच्या केंब्रिज लेआऊटजवळील उलसूर मार्केटमध्ये ते बनवण्यात आले आहे.

हे बांधकाम ज्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात आले आहे ते अनेक अर्थांनी विशेष आहे. साधारणपणे एक हजार स्क्वेअर फुटांवर घर बांधण्यासाठी सुमारे 12 महिने लागतात, पण नवीन पोस्ट ऑफिस अवघ्या 44 दिवसांत बांधले गेले.

अशा परिस्थितीत ते थ्रीडी प्रिंटिंग तंत्र नेमके काय आहे? पोस्ट ऑफिस किती वेगळ्या पद्धतीने तयार केले गेले? सामान्य बांधकामाच्या तुलनेत ते किती स्वस्त आणि टिकाऊ आहे? आणि अशी बांधकामे देशात कुठेकुठे बांधण्यात आली आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

3D प्रिंटिंग तंत्रज्ञान म्हणजे काय?

थ्रीडी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचे नाव ऐकल्यावर बहुतेक लोकांना वाटतं की त्याचा प्रिंटरशी संबंध आहे, परंतु असं मुळीच नाही. या तंत्रात रोबोटिक्सच्या माध्यमातून लेअर बाय लेअर भिंत, छप्पर आणि जमीन तयार केली जाते.

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या प्रकारच्या बांधकाम आणि डिझाइनच्या सूचना मशीनला दिल्या जातात, त्याच पद्धतीने ते मशीन स्वयंचलितपणे या गोष्टी तयार करते. हे यंत्र घर तयार करण्यासाठी अनेक प्रकारे मदत करते.

साधारणपणे, बांधकाम तयार करताना वीट वापरली जाते. परंतु थ्रीडी प्रिंटिंगद्वारे तयार केलेल्या बांधकामात, एकतर ब्लॉक वापरले जाते किंवा ते नसतेच. या तंत्राने कमी वेळेत बांधकाम पूर्ण करता येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. साधारणपणे वीट आणि इतर बांधकामांद्वारे तयार केलेल्या इमारतीच्या तुलनेत या तंत्राद्वारे ते लवकर पूर्ण केले जाऊ शकते. अशाच प्रकारे पोस्ट ऑफिस थ्रीडी प्रिंटिंगने बांधले गेले

3D प्रिंटिंग तंत्राच्या मदतीने असे उभारण्यात आले पोस्ट ऑफिस

तंत्रज्ञान कसे कार्य करते?

साधारणपणे घर किंवा बांधकाम तयार करताना नकाशाचा अवलंब केला जातो आणि तो लक्षात घेऊन काम केले जाते. थ्रीडी प्रिंटिंगच्या बाबतीत असे होत नाही. यामध्ये सर्व काही संगणकीकृत आहे.

जो नकाशा संगणकात टाकला जातो, तो रोबोटिक्सच्या मदतीने आपोआप तयार होतो. भिंतीची रूंदी किती हवी, उंची किती असेल आणि आतील भागात कुठे आणि काय बांधायचे हे रोबोटिक यंत्रणा ठरवते.

थ्रीडी प्रिंटर अनेक प्रकारच्या मशिनला जोडून बनवले जाते. जसे की मिक्सर, पंपिंग युनिट, मोशन असेंबली, ऑपरेटिंग सॉफ्टवेअर, नोजल आणि फीडिंग सिस्टम. त्याचे नोजल हे सर्वात महत्त्वाचा भाग आहे, जो बांधकामासाठी काम करतो. प्रिंटरच्या सहाय्यानेच बांधकाम साहित्य बाहेर येत राहते आणि इमारत तयार होत राहते.

बांधकाम कसे केले जाते? हे व्हिडीओवरून समजून घ्या

बांधकाम किती स्वस्त आणि मजबूत ?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानामुळे भारतात मोठा बदल होऊ शकतो. भविष्यात या तंत्राच्या मदतीने कमी खर्चात घरे बांधता येतील. फर्स्ट पोस्टच्या रिपोर्टनुसार, 3D प्रिंटिंग कंपनी Nexa3Dचे सीईओ आणि चेअरमन Avi म्हणतात की, जर या तंत्रज्ञानाने घर बांधले गेले तर त्याचे बरेच फायदे आहेत. सामान्य बांधकामाच्या तुलनेत ते कमी वेळेत तयार होते. कमी खर्च येतो आणि अधिक मजबूत असते.

या तंत्रज्ञानाने देशात काय काय बांधलं ?

आतापर्यंत या तंत्राने देशात अनेक बांधकामे झाली आहेत. आयआयटी मद्रासने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये या तंत्रज्ञानासह घर बांधले होते. यानंतर देशात अनेक बांधकामे झाली. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये IIT गुवाहाटीने भारतीय लष्कराच्या सैनिकांसाठी 3-डी प्रिंटेड मॉड्युलर काँक्रीट पोस्ट तयार केली होती.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT