ओला इलेक्ट्रिक कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी आज भारताचं पहिलं फुल-स्टॅक एआय टूल लाँच केलं. कृत्रिम असं या AI टूलचं नाव आहे. या टूलची खासियत म्हणजे, हे तब्बल 22 भारतीय भाषांना ओळखू आणि समजू शकतं. यामुळेच भारतात चॅटजीपीटी आणि बार्ड या दोन तगड्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सला कृत्रिम तगडी टक्कर देऊ शकतं.
कृत्रिम हे चॅटजीपीटी किंवा इतर एआय टूल्सप्रमाणेच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार आहे. सोबतच कविता करणे, कथा लिहिणे आणि कोडिंग करणे अशी कामंही हे एआय टूल आरामात करू शकेल.
ओला इलेक्ट्रिक कंपनीने याला 'पहिला भारतीय फुल स्टॅक एआय' म्हटलं आहे. कृत्रिम हे स्थानिक भारतीय भाषा आणि माहितीवर आधारित असल्याचं सांगण्यात येत आहे. या टूलच्या माध्यमातून एआयची पॉवर आम्ही लोकांच्या हातात देऊ. तसंच, यामुळे भारतीयांच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे, असं भाविश यांनी यापूर्वी म्हटलं होतं. (AI based on Indian languages)
'कृत्रिम'चे दोन व्हेरियंट येणार आहेत. यातील पहिलं बेस मॉडेल असणार आहे. याला दोन ट्रिलियन टोकन आणि युनिक डेटासेटच्या मदतीने ट्रेन करण्यात आलं आहे. याचं दुसरं व्हर्जन 'कृत्रिम प्रो' हे अधिक जटिल आणि अॅडव्हान्स असणार आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये हे लाँच केलं जाईल असं भावेश यांनी स्पष्ट केलं. ( There will be two versions)
भाविश यांनी कृत्रिमच्या लाँच इव्हेंटमध्ये या एआयवर आधारित एक एआय चॅटबॉट देखील सादर केला. हा चॅटबॉट 22 भारतीय भाषा समजू शकतो, आणि 10 भारतीय भाषांमध्ये टेक्स्ट जनरेट करू शकतो. 'कृत्रिम'ची टीम ही संपूर्ण भारतात आणि अमेरिकेत पसरली आहे, असंही यावेळी सांगण्यात आलं. (AI tool)
Krutrim Si Designs ही कंपनी यावर्षी एप्रिल महिन्यात लाँच करण्यात आली होती. भाविश अग्रवाल आणि कृष्णमूर्ती वेणुगोपाल टेन्नेटी यांनी मिळून ही कंपनी स्थापन केली होती. कृष्णमूर्ती हे एएनआय टेक्नॉलॉजिस कंपनीचे बोर्ड मेम्बर आहेत. ही कंपनी ओला कॅब्स आणि ओला इलेक्ट्रिक या कंपन्यांची पॅरंट कंपनी आहे.
कृत्रिम एआय मॉडेलची वेबसाईट ही लाईव्ह आहे. याठिकाणी जाऊन लोक आपल्या फोन नंबरच्या मदतीने रजिस्ट्रेशन करू शकतात. जेव्हा कृत्रिमचा चॅटबॉट उपलब्ध होईल, तेव्हा कंपनी स्वतः लोकांना याबाबत माहिती देईल. (When will it be available)
बेस मॉडेल हे पुढील महिन्यापासूनच सर्वांसाठी उपलब्ध होणार असल्याचं अग्रवाल यांनी स्पष्ट केलं. तसंच कंपनी यासाठी वेगळं अॅपदेखील तयार करत आहे, जे फेब्रुवारी 2024 पर्यंत लाँच करण्यात येईल असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.