infinix hot 12 launched in india at rs 9499 check specifications features and details here  
विज्ञान-तंत्र

दहा हजारांत बेस्ट स्मार्टफोन; मिळतो 50MP कॅमेरा अन् 6000mAh बॅटरी

सकाळ डिजिटल टीम

तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असात आणि स्वस्तात मिळणारा एखादा फोन शोधत असला, तर स्मार्टफोन ब्रँड Infinix ने भारतात आपला नवीन एंट्री लेव्हल स्मार्टफोन Infinix Hot 12 लॉन्च केला आहे. Infinix Hot 12 हा फोन बाजारात 50 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरासह सादर करण्यात आला आहे. यात 6,000mAh बॅटरी आणि 6.82-इंचाचा HD प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, तुम्हाला MediaTek Helio G37 प्रोसेसर आणि 4 GB रॅमसह 64 GB स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये तुम्हाला इतर कोणते स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स मिळणार आहेत ते जाणून घ्या..

Infinix Hot 12 ची किंमत

Infinix Hot 12 ला पर्पल, एक्सप्लोरेटरी ब्लू, पोलर ब्लॅक आणि सियाल या चार रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनच्या सिंगल स्टोरेज व्हेरिएंट 4 GB RAM सह 64 GB स्टोरेजची किंमत 9,499 रुपये आहे. फोन 23 ऑगस्टपासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल.

Infinix Hot 12 चे स्पेसिफिकेशन

Infinix Hot 12 मध्ये Android 11 आधारित XOS 10 देण्यात आलेले आहे. यात 6.82-इंचाचा HD+ LCD IPS डिस्प्ले, जो 90Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटसह येतो देण्यात आला आहे. फोनमध्ये Octa-core MediaTek Helio G37 प्रोसेसर आणि 4 GB RAM सह 64 GB स्टोरेज दिले आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता देखील येते.

Infinix Hot 12 चा कॅमेरा

फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला असून तो 50-मेगापिक्सेल प्राइमरी लेन्स, 2-मेगापिक्सेल डेप्थ आणि AI सेन्सरसह येतो. सेल्फीसाठी फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. तसेच, फोनच्या मागील बाजूस क्वाड आणि समोर ड्युअल एलईडी फ्लॅश आहे.

Infinix Hot 12 ची बॅटरी

Infinix Hot 12 ला 6,000mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग मिळते. कनेक्टिव्हिटीसाठी फोन ड्युअल VoLTE, OTG ब्लूटूथ, वाय-फाय, मायक्रो यूएसबी पोर्ट आणि सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर सपोर्ट देखील मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta fadnavis on CM Post: महायुतीचा मोठा विजय, राजकीय चर्चेला उधाण! मुख्यमंत्री पदाबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या...

Chandgad Assembly Election 2024 Results : चंदगडला भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील ठरले जायंट किलर; मिळवला मोठ्या मताधिक्याने विजय

Devendra Fadnavis: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्रीपद कुठल्याही निकषांवर नाही!

BJP Candidate Ravisheth Patil Won Pen Assembly Election : प्रसाद भोईर यांना पराभूत करत भाजपच्या रवीशेठ पाटीलांचा दणदणीत विजय

Sneha Dubey Vasai Assembly Election 2024 Result: वसई मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकला; स्नेहा दुबे यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT