infinix hot 12 pro-first sale today in india on flipkart know discount and sale offers and all features prices  
विज्ञान-तंत्र

Infinix Hot 12 Pro चा आज पहिला सेल, मिळतोय बंपर डिस्काउंट

सकाळ डिजिटल टीम

Infinix ने 2 ऑगस्ट रोजी भारतात त्यांच्या Hot 12 सीरीजचा लेटेस्ट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने या फोनला Infinix Hot 12 Pro असे नाव दिले असून Infinix Hot 12 Pro आज प्रथमच भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. हा फोन ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. हा सेल आज दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे. Infinix च्या या नवीन फोनची खासियत म्हणजे यामध्ये 8GB रॅम, 128GB स्टोरेज, एक ऑक्टा-कोर प्रोसेसर, 5000mAh बॅटरी, ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो, आज आपण हा फोन तुम्ही किती रुपयांत खरेदी करू शकता ते आज आपण जाणून घेणार आहोत.

Infinix Hot 12 Pro सेल ऑफर-डिस्काउंट

बँक ऑफर अंतर्गत Hot 12 Pro, ICICI आणि Kotak बँक ग्राहकांना 1,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे, ज्यामुळे 6 GB RAM फोन 9,999 रुपये आणि 8 GB RAM व्हेरिएंट 10,999 रुपयांमध्ये मिळत आहे. त Infinix ने 6GB + 64GB व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आणि 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे.

यासोबत, तुम्ही दरमहा 416 रुपयांच्या EMI वर देखील फोन खरेदी करू शकता. जुन्या फोनसोबत फोन एक्सचेंज केल्यावर तुम्हाला 11,250 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. म्हणजेच, संपूर्ण एक्सचेंज डिस्काउंट मिळाल्यानंतर, तुम्ही फोन फक्त 749 रुपयांमध्ये घरी घेऊन जाऊ शकता.

Infinix Hot 12 Pro फीचर्स

या फोनमध्ये 6.6-इंचाचा फ्लुइड ड्रॉप नॉच गेमिंग डिस्प्ले मिळेल. डिस्प्ले HD+ रिझोल्युशनसह देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की हा फोन या सेगमेंटमध्ये सर्वात ब्राइट डिस्प्ले देत आहे.

रॅम आणि प्रोसेसर बद्दल बोलायचे झाल्यास फोनच्या 6GB व्हेरियंटमध्ये 3GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट देखील दिला जातो, ज्यामुळे त्याची एकूण रॅम 9GB होते. त्याच वेळी, 8 GB व्हेरिएंटमध्ये, तुम्हाला 5 GB व्हर्चुअल रॅम मिळेल, ज्यामुळे त्याची एकूण RAM 13 GB पर्यंत वाढते. प्रोसेसर म्हणून, Infinix च्या या फोनमध्ये octa-core UniSoc T616 चिपसेट दिला आहे.

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ड्युअल एलईडी फ्लॅशसह 50MP AI ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फीसाठी, तुम्हाला या फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल, जो ड्युअल एलईडी फ्लॅशसह येतो. सोबतच फोनला पॉवर देण्यासाठी, यात 5000mAh बॅटरी आहे. ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीच्या मते, या बॅटरीचा स्टँडबाय टाइम 45 दिवसांपर्यंत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT