Electric Car esakal
विज्ञान-तंत्र

Electric Car : ही असेल देशातली सगळ्यात स्वस्त इलेक्ट्रिक SUV, टाटा नेक्सॉन EV ला ही टाकेल मागे

कंपनीचे लक्ष त्याच्या EV लाइनअपचा आणखी विस्तार करण्यावर आहे. कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारात येणार आहे

साक्षी राऊत

Electric Car : टाटा मोटर्सने भारतातील इलेक्ट्रिक कार बाजारात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ही देशातील पहिल्या क्रमांकाची इलेक्ट्रिक कार विकणारी कंपनी आहे. हा टप्पा गाठण्यात कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक एसयूव्ही Tata Nexon EV ची महत्वाची भूमिका आहे. टाटा कंपनी त्यांच्या टियागो आणि टिगोर या कारसुद्धा इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये विकते. आता कंपनीचे लक्ष त्याच्या EV लाइनअपचा आणखी विस्तार करण्यावर आहे. कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारात येणार आहे.

2023 ऑटो एक्सपोमध्ये, टाटा मोटर्सने त्यांच्या हॅरियर SUV ची EV व्हर्जन सादर केलं होतं, जी लवकरच लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. हॅरियर EV टाटाच्या पोर्टफोलिओमध्ये Nexon EV च्या वर स्थित असेल. Tata Motors अजून एक इलेक्ट्रिक SUV लाँच करण्याच्या विचारात आहे, जे Nexon च्या खाली स्थित असेल. रिपोर्ट्सनुसार टाटा पंच मायक्रो एसयूव्हीचे इलेक्ट्रिक व्हर्जन लवकरच लाँच करू शकते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा मोटर्स 2023 च्या अखेरीस पंच मायक्रो एसयूव्ही लाँच करण्याची योजना आखत आहे. हे वाहन Gen 2 (Sigma) प्लॅटफॉर्मवर आधारित असेल, जे Tata Altroz ​​मध्ये वापरल्या जाणार्‍या ALFA आर्किटेक्चरचं अपग्रेटेड व्हर्जन असेल. पंच EV दोन बॅटरी पॅक ऑप्शन्ससह आणले जाण्याची अपेक्षा आहे. एक बॅटरी पॅक Tiago EV सारखा 26kWh असू शकतो आणि दुसरा Nexon EV सारखा 30.2kWh बॅटरी पॅक असू शकतो. (Automobile)

पंच ईव्ही बाबत टाटा मोटर्सकडून कोणतीही अधिकृत माहिती नाही. मात्र ही कार लॉन्च झाल्यास, ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक एसयूव्ही असेल ज्याची अंदाजे किंमत 10 ते 14 लाख रुपये असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT